X

Fact Check: आपल्या लहान मुलांसोबत फिरत असलेल्या वाघिणीचा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या नावाने व्हायरल

नागपूर च्या कामठी क्षेत्रात वाघीण तिच्या तीन पिल्लांसोबत दिसल्याचे व्हायरल पोस्ट खोटे असल्याचे समजले. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो बऱ्याच वर्षांपासून इंटरनेट वर उपलब्ध आहे.

  • By Vishvas News
  • Updated: January 12, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे वाघिण, तिच्या तीन लहान मुलांसोबत असल्याची अफवा पसरली आहे. याचा पुरावा म्हणून काही सोशल मीडिया यूजर्स एक व्हिडिओही व्हायरल करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर हिंदी आणि मराठी भाषेत व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टचा सविस्तर तपास केला, व्हायरल व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेला वाघिणीचा आणि तिच्या बाळाचा व्हिडिओ जुना असल्याचे आम्हाला कळले. हा व्हिडिओ कधी मध्य प्रदेशच्या नावाने तर कधी यूपीच्या नावाने व्हायरल होत असतो. विश्वास न्यूजने हा व्हायरल व्हिडिओ कुठला आहे याची स्वतंत्रपणे पुष्टी केली नाही, मात्र नागपूर जिल्ह्यातील कामठीशी या व्हिडिओचा काहीही संबंध नसल्याची पुष्टी केली आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हिडीओ कामठीचा नाही असे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज एनजीपी न्‍यूज ने एक वीडियो अपलोड केला आणि लिहले: ‘Kamptee छावनी परिसर में 3 बच्चों के साथ दिखी बाघिन।’
फेसबुक पोस्ट ला खरे समजून दुसरे यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चे सत्य जाणून घेण्यासाठी विविध किवर्डस ने सत्य शोधण्यास सुरुवात केली. सगळ्यात जुना व्हिडिओ विश्वास न्यूज ला आईएफएस रमेश पांडे ह्यांच्या ट्विटर हॅन्डल वर सापडला. ह्यात हा व्हिडिओ 9 नोव्हेंबर 2020 रोजी चा दुधवा टाइगर रिजर्व चा सांगितलं गेला आहे. ह्यात सांगितले आहे कि हा व्हिडिओ टाइगर रिजर्व च्या फील्‍ड डायरेक्‍टर ने बनवला आहे. पूर्ण व्हिडिओ खाली बघा.

विश्वास न्यूज ने ह्या दोन व्हिडिओ चे तुलनात्मक अध्ययन केले. त्यात आम्हाला दोन्ही व्हिडिओ मध्ये बरेच साम्य असल्याचे जाणवले. दोन्ही व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या वाघिणीच्या अंगावर सारख्याच रेषा असल्याचे कळले.

विश्वास न्यूज ने अधिक माहिती साठी नागपूर स्थित एएनआई चे संवाददाता सौरभ जोशी ह्यांना संपर्क केला आणि त्यांच्या सोबत व्हायरल व्हिडिओ शेअर केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे, त्याचा कामठी सोबत काही संबंध नाही.

व्हिडिओ वरून विश्वास न्यूज ने वाइल्‍ड लाइफ विशेषज्ञ निखिलेश त्रिवेदी ह्यांना देखील संपर्क केला. त्यांनी सांगितले व्हायरल व्हिडिओ दुधवा टाइगर रिजर्व चा आहे आणि भारतात विविध ठिकाणी तिथला सांगून व्हायरल होत असतो.

आम्ही त्यानंतर फेसबुक पेज एनजीपी न्‍यूज ची सोशल स्कॅनिंग केली. त्यात आम्हाला कळले कि ह्या पेज ला 23 हजार लोकं फॉलो करतात. ह्याची एक वेबसाईट देखील आहे जी 22 मार्च 2017 मध्ये बनवण्यात आली होती.

निष्कर्ष: नागपूर च्या कामठी क्षेत्रात वाघीण तिच्या तीन पिल्लांसोबत दिसल्याचे व्हायरल पोस्ट खोटे असल्याचे समजले. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो बऱ्याच वर्षांपासून इंटरनेट वर उपलब्ध आहे.

  • Claim Review : #tigerinkamptee #kampteenews #ngpnews Kamptee छावनी परिसर में 3 बच्चों के साथ दिखी बाघिन। शहर वासियों से सतर्क रहने की अपील।
  • Claimed By : NGP News
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later