X

Fact check: महात्मा बसवेश्वर यांचे $१०० च्या नोटेवर छायाचित्र, असा दावा करणारी पोस्ट खोटी आहे

व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि यूएस ने $१०० नोटेवर महात्मा बसवेश्वर यांचे छायाचित्र वापरले, तो दावा खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: June 26, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला एक पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसली. या पोस्ट मध्ये दावा करण्यात आला होता कि महात्मा बसवेश्वर यांचे छायाचित्र अमेरिकेने त्यांच्या $१०० च्या नोटेवर वापरून भारताचा सम्मान वाढवला आहे. या पोस्ट मध्ये असे देखील म्हंटले होते कि भारतीय पंतप्रधानांनी यूएस चे आभार देखील मानले. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट आणि हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Rn Vibhute यांनी २२ जून रोजी एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: #अमेरिकेनं केला #भारताचा गौरव_ 💯🔥 शंभर डॉलर नोटांवर #लिंगायत धर्मसंस्थापक #महात्मा #बसवेश्वर #महाराज यांची प्रतिमा_ 💯🤩🔥❤️
#PM कडून #USA चे आभार_ 💪🚫 💫⚠️💪🚫👍💯🔥 #जय #शिवशरनाद_

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी हि माहिती इंटरनेट वर शोधण्यास सुरुवात केली. जर का भारताला अश्यारित्या सम्मान मिळाला असता, महात्मा बसवेश्वर याचे छायाचित्र $१०० च्या नोटेवर असते तर या बद्दल नक्की कुठे न कुठे बातम्या आल्या असत्या. पण आम्हाला कुठेच व्हायरल दाव्याची बातमी इंटरनेट वर मिळाली नाही.

पोस्ट मध्ये असा देखील दावा केला होता कि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे आभार मानले, म्हणूनच विश्वास न्यूज ने पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट तपासले, आम्हाला त्यावर दावा सिद्ध करत असलेला एक देखील ट्विट सापडला नाही.

आम्ही त्यानंतर व्हायरल होत $१०० च्या नोटेचे छायाचित्र निरखून बघितले, हि न अगदीच खऱ्या $१०० सारखी दिसत होती सगळ्या यूजर्स नि एकाच सिरीयल नंबर (CL01985909BL12) असलेली नोट शेअर केली होती.

विश्वास न्यूज च्या असे लक्षात आले कि हि नोट ऑनलाईन देखील बनवली जाऊ शकते. म्हणून आम्ही, ‘Fake $100 bill generator’ असे किवर्डस वापरून याचा तपास केला. या किवर्डसमुळे आम्ही एका वेबसाईट वर पोहोचलो, ‘Make fake personalized 100 dollar bill with your face online’. हि वेबसाईट इथे बघा.

ह्या वेबसाईट चा वापर करून, लोकं स्वतःचा चेहरा असलेले $१०० च्या नोटा बनवू शकतात. या वेबसाईट वर दिलेल्या नोटांवरचा सिरीयल नंबर आणि व्हायरल होत असलेल्या महात्मा बसवेश्वर यांचे छायाचित्र असलेल्या नोटेचा सिरीयल नंबर एक सारखाच होता, त्यावरून असे लक्षात आले कि हि नोट डिजिटल रित्या बनवली गेली आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूजने, शरण साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, बसव वाणीचे संपादक, चन्नवीर भद्रेश्वरमठ यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र खोटे आहे. अमेरिकेने महात्मा बसवेश्वर यांचे छायाचित्र असलेले $१०० नोटेचे लोकार्पण केले नाही. व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.

महात्मा बसवेश्वर यांचे छायाचित्र असलेल्या $१०० नोट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. Rn Vibhute(Babaraje) हे सोलापूरचे रहिवासी आहेत आणि त्यांना ७१८ लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि यूएस ने $१०० नोटेवर महात्मा बसवेश्वर यांचे छायाचित्र वापरले, तो दावा खोटा आहे.

  • Claim Review : महात्मा बसवेश्वर यांचे $१०० च्या नोटेवर छायाचित्र
  • Claimed By : Rn Vibhute
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later