X

Fact Check: तेजस्वी यादव सीएम बनण्याच्या दावा करणारी खोटी ग्राफिक प्लेट होत आहे व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: November 9, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे जी एबीपी न्यूज च्या ग्राफिक प्लेट वर शेअर केली जात आहे, या ग्राफिक प्लेट वर लिहले आहे कि तेजस्वी चे मुख्यमंत्री बनणे अटळ आहे – पोल. विश्वास न्यूज ला हा दावा आपल्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप चॅट बोट वर देखील मिळाला (+91 95992 99372) देखील तपासासाठी मिळाला. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे कळले. एबीपी न्यूज़ च्या नावावर खोटी ग्राफिक प्लेट व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या चॅट बोट वर एबीपी न्यूज ची कथित ग्राफिक प्लेट मिळाली ज्यावर लिहले होते, ‘तेजस्वी का मुख्यमंत्री बनना तय – पोल।
अर्थात: तेजस्वी हे मुख्यमंत्री बनणे अटळ आहे – पोल.
ह्या प्लेट ला खाली बघितल्या जाऊ शकते.

या ग्राफिक प्लेट ला सोशल मीडिया च्या बाकी प्लॅटफॉर्म वर देखील शेअर केल्या जात आहे. एका यूजर द्वारे हाच दावा ट्विटर वर शेअर केला गेला. याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी इंटरनेट वर हा दावा शोधला. आम्हाला एबीपी न्यूज च्या वेबसाईट, यूट्यूब चैनल कुठेच हि रिपोर्ट मिळाली नाही, ज्यात ग्राफिक प्लेट मधला कन्टेन्ट वापरला गेला असेल.
आम्हाला एबीपी न्यूज च्या वेबसाईट वर सर्वे च्या नावावर २४ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेला एक ओपिनियन पोल मिळाला. एबीपी न्यूज ने बिहार निवडणुकांच्या आधी वोटर्स सोबत बोलून २३ ऑक्टोबर च्या रोजी एक ओपिनियन पोल केला होता. या ओपिनियन पोल च्या आधारावर एक रिपोर्ट देखील प्रकाशित केले होते, पण त्यात पण व्हायरल दाव्यातील कुठलीच माहिती नाही.

विश्वास न्यूज ने एबीपी न्यूज च्या खऱ्या प्लेट सोबत व्हायरल प्लेट ची तुलना केली. दोन्ही ग्राफिक प्लेट मध्ये फॉन्ट चा खूप अंतर आहे, हा अंतर स्पष्ट पणे दिसतो. खऱ्या ग्राफिक प्लेट च्या कन्टेन्ट चा फॉन्ट मोठा आहे, जेव्हाकी व्हायरल प्लेट मधला फॉन्ट छोटा आहे.

व्हायरल ग्राफिक प्लेट (डावा) आणि खरी ग्राफिक प्लेट (उजवा) यात फॉन्ट साईझ चा बराच अंतर बघितला जाऊ शकतो.

विश्वास न्यूज ने या संदर्भात एबीपी न्यूज च्या एडिटोरिअल डिपार्टमेंट सोबत देखील संपर्क केला, इथल्या एका सदस्याने आम्हाला सांगितले कि व्हायरल ग्राफिक प्लेट खोटी आहे. त्यांनी सांगितले कि निवडणुकांच्या वेळी (ट्विटर वर हा दावा ६ नोव्हेंबर रोजी मिळाला) या प्रकारचा सर्वे केला जात नाही.

विश्वास न्यूज ने व्हायरल ट्विट करणाऱ्या यूजर ची ट्विटर प्रोफाइल स्कॅन केली. हि प्रोफाइल, सप्टेंबर २०२० रोजी बनवली गेली होती. प्रोफाइल वर शेअर केलेल्या माहिती प्रमाणे, यूजर लखनऊ चे रहिवासी आहे, फॅक्ट-चेक कारे पर्यंत त्यांचे २९ फॉलोवर्स होते.

  • Claim Review : तेजस्वी हे मुख्यमंत्री बनणे अटळ आहे - पोल
  • Claimed By : Ashish Pal 'MONU' ‏
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later