X

Fact Check: महिलेल जेएनयू चि विद्यार्थिनी सांगून व्हायरल होत असलेला दावा खोटा

Sanjukta Basu नावाच्या महिले बद्दल व्हायरल होणाऱ्या दाव्यात ज्यात त्यांना जेएनयू ची विद्यार्थिनी म्हणून संबोधले गेले आहे, तो दावा खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: July 15, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका महिलेचे छायाचित्र व्हायरल होताना दिसले. या चित्रात महिला आपल्या काही ओळखीच्या लोकांसोबत पार्टी करताना दिसत आहे. चित्रात सांगितले आहे कि महिला जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी (JNU) मध्ये मिळत असलेल्या सबसिडी चा दुरुपयोग करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समोर आहे. चित्रात दिसत असलेल्या महिलेचे नाव, संजुक्ता बसू आहे आणि ट्विटर प्रमाणे त्या नेशनल हेराल्ड मध्ये एडिटोरियल कंसल्टेंट आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘Sabki Bajate Raho Last Bencher’ ने व्हायरल छायाचित्र शेअर करून लिहले: मिलिए सब्सिडी लेने वाली (JNU) जेएनयू की गरीब छात्रा से. या सोबत अन्य यूजर्स देखील हे छायाचित्र शेअर करत आहेत. या पोस्ट ला खाली बघा.

तपास:
सगळ्यात आधी आम्ही या चित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल चा वापर केला. आम्हाला या सर्च मध्ये Sanjukta Basu नावाचे वेरिफाइड ट्विटर अकाउंट मिळाले. या अकाउंट मध्ये दिसत असलेले छायाचित्र हेच व्हायरल चित्र आहे. खाली व्हायरल छायाचित्रात आणि संजुक्ता बसू यांचे चित्र बघून समजले जाऊ शकते.

व्हायरल छायाचित्राची आणि त्यांच्या प्रोफाइल वरची तुलना करण्यासाठी दोन छायाचित्र

आम्ही यानंतर संजुक्ता बसू यांच्या बद्दल केलेल्या दाव्याचा तपास केला. आम्ही हे जाणून घायचा प्रयत्न केला कि त्या जेएनयू सोबत संबंधित आहेत का, किंवा त्यांनी पीएचडी साठी एनरोल केले का. आम्हाला या बाबतीत कुठलीच अधिकृत माहिती मिळाली नाही.

Sanjukta Basu यांच्या वेरिफाइड अकाउंट वर दिलेल्या माहिती प्रमाणे, त्या नेशनल हेराल्ड मध्ये एडिटोरियल कंसलटेंट आहेत. तसेच त्या Ex-Lawyer, Author, Photographer देखील आहे. त्यांच्या अकाउंट वर मिळालेल्या मिळालेल्या माहिती प्रमाणे त्या Women’s political space विषयावर PhD करत आहेत. पण इथे कुठेच जेएनयू चा उल्लेख केला नाही आहे. त्यांच्या अकाउंट वर कळले कि त्या एका विशिष्ट पार्टी चे समर्थन करतात.

आम्हाला लिंकडिन वर संजुक्ता यांचे प्रोफाइल मिळाले. त्यात सांगितले होते कि त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधून बीए, एलएलबी केले आहे. इथे देखील जेएनयू चा उल्लेख नव्हता. याच प्रमाणे, https://sanjukta.wordpress.com/ त्यांच्या वेबसाईट वर दिलेल्या माहिती वर देखील कुठेच जेएनयू चा उल्लेख नाही.

आम्ही अधिक माहिती साठी सरळ Sanjukta Basu यांना संपर्क केला. फोन वर त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि त्यांनी आपल्या अकादमिक जीवन मध्ये कुठलाच कोर्स जेएनयू मधून केला नाही. पण त्यांनी हे सांगण्यास मनाई केली कि त्या पीएचडी कुठून करत आहेत. त्यांनी सांगितले कि व्हायरल खोटा आहे. त्यांनी हे देखील सांगितले कि त्यांनी फेसबुक वर देखील याची कंप्लेंट केली आहे.

आम्ही व्हायरल दावा करणाऱ्या फेसबुक यूजर Sabki Bajate Raho Last Bencher या प्रोफाइल ला स्कॅन केले. तपासात कळले कि हा प्रोफाइल एका विशिष्ट पार्टी चे समर्थन मध्ये ट्विट करतात.

निष्कर्ष: Sanjukta Basu नावाच्या महिले बद्दल व्हायरल होणाऱ्या दाव्यात ज्यात त्यांना जेएनयू ची विद्यार्थिनी म्हणून संबोधले गेले आहे, तो दावा खोटा आहे.

  • Claim Review : हि महिला जेएनयू च्या सबसिडी चा दुरुपयोग करत आहे.
  • Claimed By : Sabki Bajate Raho Last Bencher
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later