X

Fact Check: चंद्रशेखर रावण आणि विनय दुबे यांच्या धर्मावरून शेअर केलेले पोस्ट खोटे आहे

दुबे आणि चंद्रशेखर रावण हे दोघे मुसलमान नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: October 22, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये दोन व्यक्ती चंद्रशेखर रावण आणि विनय दुबे यांचे छायाचित्र दिसतात. छायाचित्रात असा दावा करण्यात येत आहे कि हे दोघे मुसलमान आहेत. विनय दुबे यांना लोकडाऊन दरम्यान एप्रिल महिन्यात प्रवासी मजदुरांची गर्दी जमवण्याच्या दोषात अटक करण्यात आली होती. तसेच चंद्रशेखर रावण हे भीम आर्मी सह-संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. विश्वास न्युज च्या तपासात या दिघंची धर्मावर केलेला दावा खोटा ठरला.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर S Mehta नावाच्या एका यूजर ने शेअर केले. पोस्ट मध्ये केलेले दावे खालील प्रमाणे:

मूळ नाव- नसीमुद्दीन खान
खोटे नाव – चद्रशेखर रावण
वडिलांचे नाव – मेहमूद
मुलगा – विनोद दुबे।
जागे व्हा हिंदू, या खोटारड्यांना ओळखा.

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:
व्हायरल मेसेज चा तपास करताना आम्ही सगळ्यात आधी इंटरनेट वर विनय दुबे यांच्या बद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आम्हाला त्या दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या. या रिपोर्ट्स प्रमाणे, दुबे हे नवी मुंबई मधील ऐरोली चे रहिवासी आहेत आणि ते स्वतःला समाज सेवक म्हणवतात. त्यांचा कॉर्पोरेट ट्रेडिंग चा व्यवसाय आहे. दुबे हे २०१९ साली कल्याण सीट वरून महाराष्ट्र विधान सभेचे निवडणूक लढले होते, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. माय नेता, या संकेतस्थळावर असलेल्या त्यांच्या माहिती प्रमाणे, त्यांच्या वडिलांचे नाव जटाशंकर दुबे असे आहे.

आम्हाला दुबे यांनी एप्रिल महिन्यात केलेला एक ट्विट देखील मिळाला, ज्यात त्यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या ट्विट ला रिट्विट केले होते. देशमुख यांनी एक छायाचित्र शेअर केले होते, ज्यात लिहले होते कि रिक्षा चालक जटाशंकर दुबे यांनी आपल्या बचत केलेल्या पैश्यातून २५००० रुपये हे कॉरोन पीडितांसाठी दान दिले. या ट्विट ला रिट्विट करून विनय यांनी लिहले होते कि त्यांना आपल्या वडिलांवर गर्व आहे.

https://twitter.com/The_vinaydubey/status/1248578193155428353?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1248578193155428353%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_0&ref_url=https%3A%2F%2Fwww.vishvasnews.com%2Fpolitics%2Ffact-check-viral-claim-about-the-religion-of-chandrashekhar-ravan-and-vinay-dubey-is-fake%2F

आता हे स्पष्ट झाले कि त्यांच्या वडिलांचे नाव महमूद नव्हे तर जटाशंकर दुबे आहे.

या नंतर आम्ही भीम आर्मी चीफ चंद्रशेखर रावण यांच्याबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली. आम्हाला समजले कि व्हायरल पोस्ट मध्ये त्यांच्याबद्दल केलेला दावा चुकीचा आहे. त्यांचे नाव नसीमुद्दीन खान नसून चंद्रशेखर असेच आहेत.

विश्वास न्यूज ने भीम आर्मी चे नेशनल कोऑर्डिनेटर कुश अंबेडकर वादी यांच्यासोबत संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे आणि हे देखील स्पष्ट केले कि चंद्रशेखर यांचे नाव नसीमुद्दीन खान नसून चंद्रशेखरच आहे. त्यांनी आम्हाला हे देखील सांगितले कि हे दावे दीड-दोन वर्षं जुने आहेत पण यात काही तथ्य नाही आहे.
कुश ने आमच्यासोबत चंद्रशेखर यांचे आधार कार्ड देखील शेअर केले, त्यात त्यांचे नाव चंद्रशेखर असेच होते.

शेवटी आम्ही, फेसबुक वर S Mehta, हे फेसबुक पै ज ज्यांनी हि पोस्ट शेअर केली, त्यांचा प्रोफाइल स्कॅन करून बघितले, तेव्हा आम्हाला कळले कि त्यांना ११० लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: दुबे आणि चंद्रशेखर रावण हे दोघे मुसलमान नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे.

  • Claim Review : चंद्रशेखर रावण आणि विनय दुबे हे दुसऱ्या धर्माचे आहे
  • Claimed By : S Mehta
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later