X

Fact-Check: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चिनी नेता नाही, किर्गिस्‍तान चे राष्ट्रपती आहेत

निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात असे समजले कि चीन चा संबंध जोडून जे छायाचित्र व्हायरल होत आहे, ते जुने आहे. पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. छायाचित्रात मोदींसोबत किर्गिस्‍तान चे राष्ट्रपति आहेत.

  • By Vishvas News
  • Updated: July 2, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज):
सोशल मीडिया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक जुना छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे, काही लोकांनी याचा संबंध सध्याच्या भारत-चीन संबंधांसोबत जोडला आहे. या छायाचित्रात नरेंद्र मोदी एका पारंपरिक वेशात, एका विदेशी नेत्या बरोबर हाथ मिळवताना दिसतात. यूजर्स या छायाचित्राला चीन चा समजून शेअर करत आहेत.
विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत किर्गिस्‍तान चे राष्ट्रपती जीनबेकोव आहेत. हे छायाचित्र, जून २०१९ मध्ये काढण्यात आले आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Mukesh Gupta @MukeshForInc यांनी २८ जून रोजी एक छायाचित्र अपलोड केले आणि त्यात लिहले, #ModiChiniBhaiBhai बस इसी गठजोड़ ने देश की “वाट” लगाई…!!

या व्हायरल पोस्ट ची अर्काइव्ह लिंक बघा.

तपास:

विश्वास न्युज ने सगळ्यात आधी गूगल रिवर्स इमेज टूल वापरून या छायाचित्राचा तपास केला. हे छायाचित्र आम्हाला विविध वेबसाईट वर आढळले. १६ जून २०१९ रोजी हे छायाचित्र द हिंदू नावाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आले होते, ज्यात लिहले होते कि किर्गिस्तान चे राष्ट्रपती सुरोनबे जीनबेकोव राजधानी बिशकेक मध्ये आपली पारंपरिक वेशभूषा नरेंद्र मोदी यांना भेट करताना.
इंग्रजीत मजकूर असा होता:
In Bishkek, Kyrgyzstan President Jeenbekov presented Prime Minister Narendra Modi a Kalpak (hat), a Chapan (coat) and a Samovar (container to boil water.).

तपासादरम्यान आम्हाला खरे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डल @PMOIndia वर देखील सापडले. त्या छायाचित्राबरोबर त्यांनी अजून तीन फोटो पोस्ट केले होते. त्यात पण किर्गिस्तान चे राष्ट्रपती जीनबेकोव यांनी कसे मोदींना त्यांचा पारंपरिक पोशाख भेटस्वरूप दिला असे नमूद केले आहे. हा ट्विट १५ जून २०१९ रोजी करण्यात आला होता.

या नंतर आम्ही भाजपा चे प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्‍गा यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल झालेले छायाचित्र एक वर्ष जुने आहे. हे तेव्हा काढले होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्‍तान च्या यात्रेवर गेले होते. या छायाचित्राला लोकं चीन सोबत संबंध जोडून व्हायरल करत आहेत, जे खोटे आहे.
शेवटी आम्ही खोटा दावा करणाऱ्या व्यक्ती चे ट्विटर हॅन्डल तपासले, त्यात असे कळले कि यूजर चे एका विशिष्ठ राजनेतिक पार्टी सोबत संबंध आहेत. हे ट्विटर हॅन्डल डिसेंबर २०१४ मध्ये बनवण्यात आले होते.

निष्कर्ष: निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात असे समजले कि चीन चा संबंध जोडून जे छायाचित्र व्हायरल होत आहे, ते जुने आहे. पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. छायाचित्रात मोदींसोबत किर्गिस्‍तान चे राष्ट्रपति आहेत.

  • Claim Review : #ModiChiniBhaiBhai बस इसी गठजोड़ ने देश की
  • Claimed By : Mukesh Gupta
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later