X

Fact Check: ईडी ला घेऊन राहुल गांधींनी नाही केले हे ट्विट

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि राहुल गांधी ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट फेक आहे.

  • By Vishvas News
  • Updated: June 20, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली. यानंतर राहुल गांधींबाबत एक फेक ट्विट व्हायरल होत आहे. हा व्हायरल करताना राहुल गांधींची खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या मते, हे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. विश्वास न्यूजने तपास केला, राहुल गांधींच्या नावाने व्हायरल झालेले ट्विट खोटे निघाले. त्यांनी असे कोणतेही ट्विट केलेले नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ‘हिंदुत्व से बढ़कर कोई धर्म नहीं”गौ गीता गंगा और गायत्री’ ने 18 जून रोजी राहुल गांधी ह्यांचे एक खोटे ट्विट शेअर केले: ‘अब वो क्या करना चाहते होंगे?’

ह्या ट्विट मध्ये लिहले होते: ED मुझे झुकाना चाहती हैं लेकिन मैं झुकूंगा नहीं मुझे सब मालूम है वो क्‍या करना चाहते हैं।

पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तसा दिला गेला आहे. ह्याला खरे समजून यूजर्स व्हायरल करत आहेत. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूजने राहुल गांधींचे अधिकृत ट्विटर हँडल स्कॅन करून तपास सुरू केला. त्यांच्या हँडलवर व्हायरल झालेले ट्विट आम्हाला कुठेही सापडले नाही.

व्हायरल ट्विट आणि राहुल गांधींचे मूळ ट्विट यात अनेक तफावत आम्हाला दिसली. राहुल गांधींचे मूळ ट्विट आयफोनवरून केले जातात, तर व्हायरल ट्विटमध्ये अँड्रॉइडचा वापर करण्यात आला होता. याशिवाय व्हायरल ट्विटमध्ये हिंदीच्या अनेक चुकाही पाहायला मिळाल्या. इतकेच नाही तर मूळ ट्विटमध्ये भाषांतराचा पर्याय येतो, परंतु व्हायरल ट्विटमध्ये असा कोणताही पर्याय दिसला नाही.

तपास सुरू ठेवत विश्वास न्यूजने एमपी काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आनंद जाट यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की व्हायरल ट्विट पूर्णपणे बनावट आहे.

आता आम्हाला त्या पेजबद्दल जाणून घ्यायचे होते ज्याने राहुल गांधींच्या नावाने फेक ट्विट व्हायरल केले होते. ‘हिंदुत्व से बढ़कर कोई धर्म नहीं “गौ गीता गंगा और गायत्री’ या फेसबुक पेजच्या सोशल स्कॅनिंगवरून असे दिसून आले आहे की, युजरला दीड लाखांहून अधिक लोक फॉलो करत आहेत. हा पेज 27 जानेवारी 2013 रोजी तयार केले गेला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि राहुल गांधी ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट फेक आहे.

  • Claim Review : राहुल गांधी चे ट्विट
  • Claimed By : ‘हिंदुत्व से बढ़कर कोई धर्म नहीं “गौ गीता गंगा और गायत्री’
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later