X

Fact Check: संविधानावर संशोधनावर रंजन गोगोई यांनी नाही केले ट्विट

विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि राज्‍यसभा खासदार रंजन गोगोई यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट खोटे आहे.

  • By Vishvas News
  • Updated: June 16, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): चीफ जस्टीस पदावरून रिटायर झालेले आणि आता राज्यसभा चे खासदार रंजन गोगोई यांच्या नावावर एक ट्विट सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या ट्विट द्वारे यूजर्स दावा करत आहेत कि रंजन गोगोई यांनी संविधानाच्या काही लेखांमध्ये संशोधनाची मागणी केली आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर बिरमा राम जाट ने १५ जून रोजी श्री श्याम प्रेम मंडल नावाच्या एका ग्रुप वर रजन गोगोई च्या नावाचे व्हायरल ट्विट पोस्ट केले होते. यात लिहले होते: ”मुस्लिम”, ”बौद्ध” और ”ईसाई” अपने अपने ”त्‍योहार” कैसे मानाएंगे? यह उनके समाज के लोग तय करेंगे, लेकिन हिन्‍दू अपने ”त्‍योहार” कैसे मनाएंगे? यह भारत का कोर्ट तय करेगा! भारतीय संविधान के भेदभाव मूलक अनुच्‍छेद 25, 26, 27, 28, 29, 30 और 31 में अब संशोधन किया जाना चाहिए।’

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी रंजन गोगोई यांच्या ट्विटच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी गूगल सर्च ची मदत घेतली. आम्हाला गोगोई यांच्याशी संबंधित एक पण बातमी मिळाली नाही. जर का गोगोई यांनी असे विधान दिले असते तर नक्कीच याची बातमी बनली असती. तपासाच्या पुढच्या टप्प्यात व्हायरल ट्विट मध्ये असलेल्या @RanjanGogoii या हॅन्डल चा शोध आम्ही घेतला, तेव्हा कळले कि हे अकाउंट अस्तित्वात नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण च्या विशेष संवाददाता माला दीक्षित यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हा रंजन गोगोई यांचा फेक अकाउंट आहे.

आता आम्ही पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला, त्यात कळले कि फेसबुक यूजर बिरमा राम जाट हे राजस्थान च्या डीडवाना चे रहिवासी आहेत. यापेक्षा जास्ती माहिती ह्या अकाउंट वर मिळाली नाही.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि राज्‍यसभा खासदार रंजन गोगोई यांच्या नावाने व्हायरल होत असलेले ट्विट खोटे आहे.

  • Claim Review : संविधानावर संशोधनावर रंजन गोगोई चे ट्विट
  • Claimed By : बिरमा राम जाट
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later