X

Fact Check: अभिनेता सोनू सूद यांचे छायाचित्र एडिट करून केले जात आहे व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: November 3, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेते सोनू सूद एका राजकीय पार्टीचा प्रचार करत, एक पोस्टर हातात पकडून उभे असलेले दिसतात. पोस्टवर लिहले गेले आहे, “सोनू सूद ने म्हंटले कि बिहार चा विकास करण्यासाठी तेजस्वी ला वोट द्या.” विश्वास न्यूज ला आपल्या तपासात असे कळले कि हा दावा खोटा आहे. हे छायाचित्र एडिटेड आहे. सोनू सूद ने एका आर्टिस्ट द्वारे काढलेले एक छायाचित्र घेऊन उभे असल्याचे
दिसत आहे. आरजेडी चा प्रचार करत असताना त्यांनी पोस्टर हातात घेतले नाही.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल पोस्ट मध्ये सोनू सूद एका पॉलिटिकल पार्टी राष्ट्री या जनता दल चा प्रचार करताना दिसतात. पोस्ट वर लिहले आहे:
सोनू सूद ने कहा बिहार के विकास के लिए तेजस्वी जी को वोट दें।

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
या पोस्ट चा तपास करताना, आम्ही सगळ्यात आधी हे छायाचित्र गूगल रिवर्स इमेज मध्ये अपलोड केले आम्हाला jagran.com वर सोनू सूद चे छायाचित्र मिळाले पण त्यांच्या हातात एक वेगळे छायाचित्र होते, RJD चे पोस्टर नव्हते. या छायाचित्रासोबत लिहले होते, “बॉलीवूड चे अभिनेता सोनू सूद, हे लॉकडाउन दरम्यान खरे हिरो म्हणून समोर आले आहे, त्यांनी हजारो मजदुरांना मुंबई मधून आपल्या घरी बस द्वारे पाठवले. शहरातील कलाकार अर्जुन दास यांनी त्यांना समर्पित एक छायाचित्र कॅनवास वर काढले.

सोनू सूद आणि अर्जुन दास यांची एक मुलाखत आम्हाला व्हिडिओ स्वरूपात देखील मिळाली ज्याला अर्जुन दास यांनी १९ ऑक्टोबर रोजी ट्विट करून शेअर केले. या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतं कि त्यांच्या हातात कुठल्याच पार्टी चे पोस्टर नाही आहे, पण त्यांनी त्यांच्या आई-बाबांचे पेंटिंग केले होते. हा व्हिडिओ शेअर करून अर्जुन दास यांनी लिहले, “@SonuSood सोनू भाई , मुझे मुम्बई बुलाने और इतना सम्मान देने के लिये बहुत-बहुत धन्यवाद, आभार 🙏💐💐 हमारा जमशेदपुर का प्यार आपके साथ हमेशा है कभी जरुर याद किजीये। मुझे गर्व होगा। Also thanks to @shubhamVawasthi Bhai & @FcSonuSood”

आम्ही या संदर्भात सरळ अर्जुन दास यांच्यासोबत पण संपर्क केला, त्यांनी सांगितले, “हे छायाचित्र एडिटेड आहे. व्हायरल छायाचित्रात सोनू सूद यांच्या सोबत मी उभा आहे. पण छायाचित्राला एडिट केले गेले आहे. या छायाचित्रात सोनू सूद आणि त्यांच्या आई बाबांचे छायाचित्र होते.”

आता आम्हाला हे माहिती करून घ्यायचे होते कि त्यांनी बिहार निवडणुकांमध्ये कोणत्या पार्टी चे समर्थन केले आहे का, आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही. आम्हाला सोनू सूद ने २८ ऑक्टोबर रोजी केलेले एक ट्विट सापडले. या ट्विट मध्ये त्यांनी लोकांना बरोबर कॅन्डीडाते ला वोट करण्यास अपील केले आहे, त्यात लिहले होते, “जिस दिन हमारे बिहारी भाइयों को घर छोड़ कर दूसरे राज्य नहीं जाना पड़ेगा। जिस दिन दूसरे राज्य के लोग बिहार में काम ढूंढने आएंगे। उस दिन देश की जीत होगी। वोट के लिए बटन उंगली से नहीं दिमाग़ से लगाना 🙏” पण इथे कुठल्याच कॅन्डीडेट चा उल्लेख केला गेला नव्हता.


हि पोस्ट सोशल मीडिया वर बऱ्याच लोकांनी शेअर केली आहे, त्यातील एक म्हणजे “‘तेजस्वी यादव फैंस क्लब बिहार” नावाचा फेसबुक पेज. या पेज चे फेसबुक वर ३५,४९१ फॉलोवर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि हा दावा बरोबर नाही आहे, हे छायाचित्र एडिटेड आहे. खऱ्या छायाचित्रात सोनू सूद यांच्या हातात, एका आर्टिस्ट द्वारे बनवलेले एक पैंटिंग आहे, आरजेडी चा प्रचार करावणारे कुठले पोस्टर नाही.

  • Claim Review : सोनू सूद ने म्हंटले बिहार च्या विकासासाठी तेजस्वी यादव ला मत द्या.
  • Claimed By : तेजस्वी यादव फैंस क्लब बिहार
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later