X

Fact Check: जागतिक महिला दिवसांतर्गत आदिदास नाही वाटत आहे मोफत जोडे, व्हायरल दावा खोटा आहे

व्हायरल पोस्ट खोटी आहे. महिला दिवसाच्या निमित्ताने, आदिदास मोफत जोडे देत नाही आहे.

  • By Vishvas News
  • Updated: March 9, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एका लिंक बरोबर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे कि आदिदास जागतिक महिला दिवस च्या निमित्ताने एक मिलियन जोडे मोफत देत आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. आदिदास ने या दाव्याचे खंडन करून हा दावा खोटा असल्याचे सांगितले.

काय होत आहे व्हायरल?
एक लिंक सोबत व्हायरल होत असलेल्या पोस्ट मध्ये लिहले आहे कि आदिदास कंपनी महिला दिवसाच्या निमित्त्ताने एक मिलियन जोडे मोफत देत आहे. बऱ्याच यूजर्स ने हि लिंक शेअर करून या बाबतीत संशय दर्शविला आहे.
आम्हाला फेसबुक वर देखील हा दावा मिळाला.

तपास:
या लिंक वर क्लिक केल्यानंतर एक लकी ड्रॉ चा पेज उघडतो, जिथे यूजर ला दिलेल्या ९ डब्ब्यांमधून एका डब्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. बॉक्स वर क्लिक केल्यानंतर एक पॉप उप मेसेज दिसतो ज्यात अभिनंदनाचा एक मेसेज दिसतो. मेसेज मध्ये सांगितले जाते कि यूजर ला हे जोडे ८-१० दिवसात पाठवण्यात येतील. हा मेसेज नंतर ५ ग्रुप्स किंवा २० मित्रांना शेअर करण्यास सांगितले जाते.

युआरएल बघितल्या बघितल्या लक्षात येते कि हि वेबसाईट अधिकृत आदिदास ची वेबसाईट नाही.

जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने आदिदास कंपनी ने वॉच अस मूव हे अभियान सुरु केले, जे एक महिला सशक्तीकरणाच्या दिशेने सुरु केलेले अभियान आहे. आम्हाला कुठलाच प्रामाणिक स्रोत मिळाला नाही ज्यात असा दावा करण्यात येईल कि आदिदास मोफत जोडे वाटत आहे.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात ई-मेल द्वारे आदिदास सोबत संपर्क केला. आदिदास ने मेल चे उत्तर देत सांगितले, “आम्ही तूम्हाला सूचित करू इच्छितो कि आम्ही अश्या प्रकारचा कुठलाच ऑफर देत नाही, कृपया व्हायरल मेसेज वर विश्वास ठेऊ नये.”

निष्कर्ष: व्हायरल पोस्ट खोटी आहे. महिला दिवसाच्या निमित्ताने, आदिदास मोफत जोडे देत नाही आहे.

  • Claim Review : आदिदास मोफत जोडे देत आहे
  • Claimed By : Asmae Asmae Nour
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later