X

Fact Check: वृत्तपत्रात नाही छापले गेले हे खोटे विज्ञापन, व्हायरल पोस्ट फेक आहे

विश्वास न्यूज च्या तपासात दिल्ली सरकारच्या नावावर व्हायरल होत असलेली जाहिरात खोटी असल्याचे समोर आले. हिन्दुस्‍तान वृत्तपत्रात अशी कुठलीच जाहिरात आली नाही. काही लोकांनी मुद्दाम 9 जुलै रोजी दैनिक हिन्दुस्तान मध्ये प्रकाशित जाहिरातीला एडिट करून व्हायरल केले.

  • By Vishvas News
  • Updated: October 14, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नुकतेच कोळस्याची कमी असल्याने देशावर संकटाचे सावट आहे आणि त्याबद्दल सोशल मीडिया वर दिल्ली सरकार वरून बरेच मेसेज व्हायरल होत आहेत. त्यात आम्हाला अशीच एक जाहिरात दिसली. यूजर्स ह्याला शेअर करून दावा करत आहेत कि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्या जाहिरातीतून लोकांना कोळसा दान करण्यास सांगत आहेत. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केल्यावर कळले कि हि जाहिरात खोटी आहे. दिल्‍ली सरकार कडून अशी कुठलीच जाहिरात देण्यात आली नाही. कोणीतरी ने 9 जुलै 2021 हिन्दुस्‍तान वृत्तपत्रात छापलेली जाहीरकट एडिट करून सोशल मीडिया वर व्हायरल केली आहे.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर हि खोटी जाहिरात व्हायरल होत आहे. लोकं ह्याला शेअर करून दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वर निशाणा साधत आहे. ट्विटर हैंडल शांडिल्‍य शिवम सिंह ने 12 ऑक्टोबर रोजी हि जाहिरात ट्विट करून लिहले: ‘नयी दिल्ली में केजरीवाल की नई पहल। आपका दान में दिया गया एक तसला कोयला बदल सकता है दिल्ली वालों की जिंदगी। गुप्त दान महा दान।’

पोस्ट चा ओरिजिनल कन्टेन्ट खाली दिलेल्या लिंक वर बघा. ह्या पोस्ट चा आर्काइव व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल जाहिरातीच्या तपासाची सुरुवात ह्याच्या स्कॅनिंग पासून केली. आम्हाला दोन गोष्टी लक्ष देण्यासारख्या दिसल्या ह्यात मास्ट हेड खाली 9 जुलै 2021 लिहले होते. आणि दुसरे जाहिरातीत अरविंद केजरीवाल च्या चित्राच्या वर कोपऱ्यात satire लिहले होते. म्हणजेच जाहिरात जुनी होती आणि satire स्पष्ट लिहले होते. पण यूजर्स ह्याला आताची समजून व्हायरल करत होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विस्वहवास न्यूज ने हिन्दुस्‍तान वृत्तपत्राचा 9 जुलै चा ए-पेपर तपासला. आम्हाला दिल्‍ली सरकार ची खरी जाहिरात ह्यात दिसली. ह्यात कोविड ने ग्रस्त परिवारांना, मुख्यमंत्री सहायता करणार असल्याच्या योजनेबद्दल सांगितले होते. ह्या जाहिरातीला एडिट करून कोळसा दान वली जाहिरात बनवण्यात आली होती, ज्याला खरे समजून सोशल मीडिया यूजर्स व्हायरल करत होते. खरे विज्ञापन इथे बघा.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात एचटी मीडिया लिमिटेड ला संपर्क केला. कंपनी चे वाइस प्रेसिडेंट आणि डिप्‍टी जनरल काउंसल गोविंद विजय, ह्यांनी सांगितले कि कोणीतरी मस्करी म्हणून आमच्या वृत्तपत्रात छापलेली जुनी बातमी एडिट करून आता व्हायरल करत आहे. हिंदुस्थान वृत्तपत्रात हि जाहिरात नाही छापल्या गेली.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि शांडिल्‍य शिवम सिंह नावाचे ट्विटर हॅन्डल ला दोन हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. यूजर बिहार चा रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात दिल्ली सरकारच्या नावावर व्हायरल होत असलेली जाहिरात खोटी असल्याचे समोर आले. हिन्दुस्‍तान वृत्तपत्रात अशी कुठलीच जाहिरात आली नाही. काही लोकांनी मुद्दाम 9 जुलै रोजी दैनिक हिन्दुस्तान मध्ये प्रकाशित जाहिरातीला एडिट करून व्हायरल केले.

  • Claim Review : ‘नयी दिल्ली में केजरीवाल की नई पहल। आपका दान में दिया गया एक तसला कोयला बदल सकता है दिल्ली वालों की जिंदगी। गुप्त दान महा दान।’
  • Claimed By : शांडिल्‍य शिवम सिंह
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later