X

Fact Check: हे आहे अनुप जलोटा आणि जसलीन च्या व्हायरल छायाचित्रामागचे सत्य, व्हायरल दावा खोटा आहे

  • By Vishvas News
  • Updated: November 20, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर भजन गायक, अनुप जलोटा आणि गायिका, अभिनेत्री जसलीन मथारू यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. छायाचित्रात अनुप यांनी एक पगडी घातल्याचे दिसत आहे तसेच, जसलीन ह्या पारंपरिक वेष-भुषेत दिसतात. दावा केला जात आहे कि या दोघांनी पण लग्न केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. हे छायाचित्र त्याच्या एका फिल्म च्या सेट वरचे आहे, दोघांनी लग्न नाही केले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर हि पोस्ट, Syed Ikram Ul haq Hashmi Official नावाच्या एका यूजर ने शेअर केली आहे, ज्यात अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या छायाचित्र सोबत लिहले आहे, “भक्ति गीत और भजन गाने की ऐसी कृपा बरसी…कि अनूप जलोटा ने अपने से 37 साल छोटी जसलीन माथारू से चौथी शादी रचा डाली.! निशब्द…

अर्थात: भक्ती गीत आणि भजन गायनात अशी कृपा झाली कि, अनुप जलोटा यांनी स्वतःपेक्षा ३७ वर्ष लाहान असलेली जसलीन मथारू यांच्या सोबत चौथे लग्न केले, निःशब्द.

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल छायाचित्रसोबत जो दावा करण्यात आला आहे, त्याला आम्ही इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला कुठल्याच प्रतिष्ठित मीडिया वेबसाईट वर ह्या दाव्याची पुष्टी करणारे रिपोर्ट मिळाले नाही.

आम्हाला जसलीन यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हे व्हायरल छायाचित्र मिळाले. जसलीन यांनी ८ ऑक्टोबर रोजी हे छायाचित्र शेअर केले होते, पण या छायाचित्रावर त्यांनी कुठलेच कॅप्शन लिहले नव्हते. हे छायाचित्र तेव्हापासूनच इंटरनेट वर व्हायरल होत आहे.

व्हायरल छायाचित्राच्यामागचे सत्य जाणून घेण्यास विश्वास न्यूज ने अनुप जलोटा यांना संपर्क केला. अनुप जलोटा यांनी सांगितले, हे व्हायरल छायाचित्र, माझे आणि जसलीन ची फिल्म, “वो मेरी स्टुडन्ट है”. फिल्म मध्ये एक सीन आहे ज्यात मी तिचे कन्यादान करतो. लग्नात वडील देखील पगडी घालतात. म्हणून मी पण पगडी घातलीय. फिल्म मध्ये कन्यादान करून मी मुलाला तिचा हाथ सोपवतो. साधारणतः लग्न समारंभात मुलगा आणि मुलीचे वडील हे पगडी घालतातच. लोकांनी या छायाचित्रावरून आपल्याच गोष्टी बनवायला सुरुवात केली आहे. लोकांनी काही पण करावे त्यांचे ते कामच आहे. सध्या चित्रपट बनून तयार आहे. सध्या चित्रपटाचे डबिंग सुरु आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत चित्रपट रिलीस होईल.

फेसबुक वर हि पोस्ट Syed Ikram Ul haq Hashmi Official या पेज ने शेअर केली. आम्ही या पेज ला स्कॅन केल्यावर कळले, त्याचे ३१०० फॉलोवर्स आहे.

निष्कर्ष: भजन गायक अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी लग्न केले नाही, त्यांचे व्हायरल छायाचित्र त्यांच्या चित्रपटाच्या सेट वरचे आहे.

  • Claim Review : अनुप जलोटा यांनी स्वतःपेक्षा ३७ वर्ष लाहान असलेली जसलीन मथारू यांच्या सोबत चौथे लग्न केले
  • Claimed By : Syed Ikram Ul haq Hashmi Official
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later