X

Fact Check: पीएम मोदी ह्यांच्या बातमीचा एडिटेड स्क्रीनशॉट खोट्या दाव्यासह व्हायरल

स्क्रीनशॉट ला एडिट करून खोट्यादाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. इंडिया टीव्ही वर अशी कुठलीच बातमी चालवण्यात आली नाही.

  • By Vishvas News
  • Updated: February 2, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूक 2022 च्या आधी काही एडिटेड स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल एक बातमी सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. ह्यात इंडिया टीव्ही ची ब्रेकिंग प्लेट दिसत आहे ज्यात मोदी ह्यांचे चित्र लागलेले आहे आणि त्यात लिहले आहे: मैं जाटों के घर से लस्सी मांग कर लाता था- नरेंद्र मोदी।
खाली लिहले आहे: मैं 20 वर्ष से जाटलैंड में रह रहा हूं- नरेंद्र मोदी।

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हा व्हायरल स्क्रीनशॉट खोटा असल्याचे समजले, एडिट करून खोट्या दाव्यासह प्लेट व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?

व्हाट्सअँप वर आम्हाला व्हायरल स्क्रीनशॉट मिळाला सोबत लिहले होते:
लो भाई जाट भाइयों नरेंद्र मोदी जी आपके घर से लस्सी मांग कर पीते रहे

फेसबुकवर देखील बरेच लोकं हा स्क्रीनशॉट मिळत्या जुळत्या कमेंट्ससह शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल स्क्रीनशॉट तपासासाठी, आम्ही प्रथम इंडिया टीव्हीच्या युटूयब चॅनेलवर ही बातमी पाहिली. यामध्ये आम्हाला 28 जानेवारी 2022 रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओ बातम्या सापडल्या. त्याचे शीर्षक होते, NCC रैली में बोले प्रधानमंत्री Modi- देश आजादी का अमृत महोत्वस मना रहा है। यामध्ये 13.05 मिनिटांनी आम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतला. जर आपण तो व्हायरल स्क्रीनशॉटसोबत जुळवला तर, वेळ देखील दोन्हीमध्ये समान आहे. वरच्या पट्टीवर ‘पंतप्रधान‘ आणि BREAKING NOW लिहिलेले आहे. हे व्हायरल स्क्रीनशॉट सारखेच आहे. त्यात लिहिले आहे, युवा देश के उत्साह में अलग ही उत्साह दिखता है- पीएम मोदी। खाली BREAKING NEWS, NCC कैडेट्स को प्रधानमंत्री मोदी का संबोधन। व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये फॉन्ट देखील भिन्न आहे.

आम्ही व्हायरल बातमी कीवर्ड सर्च ने शोधली, पण त्यात देखील आम्हाला अशी कोणतीच बातमी मिळाली नाही. 28 जानेवारी 2022 रोजी Jagran मध्ये छापून आलेल्या बातमी प्रमाणे, दिल्ली च्या करियप्पा ग्राउंड मध्ये पीएम मोदी ह्यांनी एनसीसी कॅडेट्स ला संबोधले. त्यांनी युवांना व्यसनमुक्त राहण्यास सांगितले.

आम्ही अधिक पुष्टीसाठी इंडिया टीव्ही ला संपर्क केला, त्यांनी सांगितले कि व्हायरल स्क्रीनशॉट खोटा आहे.

निष्कर्ष: स्क्रीनशॉट ला एडिट करून खोट्यादाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. इंडिया टीव्ही वर अशी कुठलीच बातमी चालवण्यात आली नाही.

  • Claim Review : पीएम मोदी ने कहा, मैं जाटों के घर से लस्सी मांगकर लाता था
  • Claimed By : FB USER- Vijay Shanker Singh
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later