X

Fact Check: पश्चिम बंगाल मध्ये पीएम मोदी यांच्या निवडणुकीच्या रॅली चा एडिटेड व्हिडिओ केला जात आहे व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: April 7, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर पीएम मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये असे दाखवण्यात येत आहे कि पीएम मोदी समोर हाथ वर करून सगळ्यांना अभिवादन करत आहेत पण समोर गर्दीच नाही.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. पश्चिम बंगाल मध्ये पीएम मोदी यांचा एक निवडणुकीचा व्हिडिओ एडिट करून खोट्या दाव्यांसह व्हायरल केला जात आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. पश्चिम बंगाल मधल्या निवडणुकीच्या रॅली चा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला गेला आहे.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया च्या वेग-वेगळ्या प्लॅटफॉर्म वर लोकं पीएम मोदी चा १७ सेकंड चा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. असेच एक Samiran Das नावाच्या ट्विटर हॅन्डल ने २ एप्रिल २०२१ रोजी हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहले, ज्यांना गर्दी नाही दिसत आहे त्यांनी आपले डोळे तपासावे.

या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.

हाच व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगाल युथ काँग्रेस च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल ने देखील शेअर केला आहे.
या ट्विट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ ला निरखून बघितले. या व्हिडिओ मध्ये आम्हाला कुठल्याच प्रकार चा साउंड मिळाला नाही. या शिवाय व्हिडिओ ची क्वालिटी पण नीट नव्हती. मोदी यांचे शेअर केलेले व्हिडिओ हे चांगल्या क्वालिटी चे असतात. विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ वजा तपास सगळ्यात आधी कीवर्डस च्या मदतीने केला आणि आताच्या निवडणुकांच्या रॅली बद्दल जाणून घयायचा प्रयत्न केला.

आम्हाला १ एप्रिल २०२१ रोजी टाइम्स ऑफ इंडिया च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ पश्चिम बंगाल च्या जयनगर मध्ये पीएम मोदी यांच्या झालेल्या एका निवडणुकीच्या रॅली चा आहे. व्हिडिओ च्या शीर्षक मध्ये सांगितले गेले आहे कि रॅली निघणाऱ्या रूट वर लोकांची लोकांची गर्दी दिसली आणि लोकांनी मोदी यांचे स्वागत केले. या व्हिडिओ मध्ये सुरुवातीचे फक्त १७ सेकण्ड दाखवण्यात आले आहे. फक्त फरक इतका आहे कि एक व्हिडिओ क्लिअर आहे आणि त्यात लोकांची नारेबाजी ऐकू येते तर दुसरा व्हिडिओ ब्लर आहे आणि त्यात आवाज ऐकू येत नाही. हा व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता.

विश्वास न्यूज ने कीवर्ड सर्च केल्यावर हाच व्हिडिओ आम्हाला बीजेपी च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल च्या पोस्ट वर देखील मिळाला. बीजेपी ने एक एप्रिल २०२१ रोजी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात देखील लोकांची गर्दी स्पष्ट दिसते.

विश्वास न्यूज ने या व्हिडिओ संदर्भात भाजप चे वरिष्ठ प्रवक्ता हरीशचंद्र श्रीवास्तव यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी व्हिडिओ सोबत केल्या जाणाऱ्या दाव्यांना खोटे असल्याचे सांगितले. तसेच ते बोलले कि रॅली मध्ये दिसत असणारी गर्दी तर जगजाहीर आहे. त्यांनी सांगितले कि हा एडिटेड व्हिडिओ आहे आणि पार्टी च्या हॅन्डल वर खरा व्हिडिओ पहिला जाऊ शकतो. हा राजनेतिक विरोधकांचा प्रोपोगांडा आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ शेअर करणारे ट्विटर यूजर Samiran Das च्या प्रोफाइल चे स्कँनिंग केले. प्रोफाइल वर दिलेल्या माहिती प्रमाणे यूजर शिलॉन्ग चे रहिवासी आहे. फॅक्ट चेक होत पर्यंत प्रोफाइल ला ४८० फॉलोवर्स होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदी यांच्या व्हिडिओ सोबत करण्यात येणार दावा खोटा आहे. पश्चिम बंगाल मध्ये पीएम मोदी यांच्या निवडणुकांचा व्हिडिओ आता एडिट करून त्यात गर्दी ला ब्लर करून व्हायरल करण्यात येत आहे.

  • Claim Review : नरेंद्र मोदी यांनी गर्दी नसताना अभिवादन केले
  • Claimed By : Samiran Das
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later