X

Fact Check: युपी सरकार च्या नावावर व्हिरल होत आहे खोटी पोस्ट

विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले. आसाम सरकार बद्दल ची जुनी पोस्ट आता उत्तर प्रदेश च्या नावाने व्हायरल होत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: August 9, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): देशभरात दहावी आणि बारावी चे निकाल जाहीर झाले आहेत. पण अश्यातच काही खोट्या बातम्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट युपी च्या सरकार बद्दल व्हायरल होताना आहाला आढळली.

या पोस्ट मध्ये एक वेबसाईट ची बातमी इथे व्हायरल करण्यात येत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि योगी आदित्यनाथ च्या सरकारने एक नवीन फतवा काढला आहेज्यात सांगितले आहे कि दहावी आणि बारावी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नौकरी साठी एक विशेष परीक्षा द्यावी लागेल.

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. युपी सरकार कडून असे कुठलेच आदेश देण्यात आले नाहीत. आसाम सरकार सोबत निगडित असलेली बातमी आता काही लोकं  युपी ची सांगून व्हायरल करत आहेत. आसाम सरकार ने नंतर आपला निर्णय वापस घेतला होता.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर राम अवतार नावाच्या यूजर ने 6 ऑगस्ट रोजी एक पोस्ट केली आणि टाईप करत लिहले ‘क्‍या बात है’. पोस्ट मध्ये उपलोडक्स केलेल्या बातमीत हेडिंग मध्ये लिहले आहे: ’10 वीं 12 वीं में प्रमोट होने वाले स्‍टूडेंट्स को सरकारी नौकरी के लिए देना होगा स्‍पेशन एग्‍जाम।’

त्या पुढे लिहले आहे: आदेश के मुताबिक कोविड के दौरान बिना परीक्षा दिए अगली क्‍लास में प्रमोट होने वाले 10वीं और 12वीं के स्‍टूडेंट्स की मार्कशीट सरकारी नौकरियों के लिए मान्‍य नहीं है।

बातमीच्या स्क्रीनशॉट मध्ये योगी आदित्यनाथ यांचे चित्र वापरण्यात आले आहे. ज्यामुळे असे दर्शवण्यात येत आहे कि हि बातमी युपी सरकार सोबत निगडित आहे पण आमच्या तपासात हे खोटे निघाले.

हि फेसबुक पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट मध्ये वापरण्यात आलेल्या बातमीची हेडलाईन  ’10वीं, 12वीं में प्रमोट होने वाले स्टूडेंट्स को देना होगा स्पेशल एग्जाम’ ला गूगल सर्च मध्ये टाकून त्याचा शोध घेतला. आम्हाला त्यात  न्‍यूज 18 च्या वेबसाईट वरची खरी बातमी सापडली. या बातमीत असे कळले कि हि बातमी आसाम ची आहे. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.

तपासात आम्हाला कळले कि आसाम च्या जुन्या बातमीच्या स्क्रीनशॉट ला योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र वापरून व्हायरल करण्यात येत आहे.

विश्वास न्यूज ला आता हे जाणून घ्यायचे होते कि आसाम सरकार ने खरेच असे निर्देश दिलेत का. त्यासाठी आम्ही परत गूगल सर्च चा वापर केला. आम्हाला टाइम्‍स ऑफ इंडिया च्या वेबसाइट वर 9 जुलै रोजी प्रकाशित एक बातमी सापडली, यात सांगितले गेले होते कि आसाम सरकार मध्ये भरती होण्यासाठी दहावी आणि बारावी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. हि पूर्ण बातमी इथे वाचा.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्य्यात, सीएम योगी आदित्यनाथ चे मीडिया सलाहकार मृत्युंजय कुमार यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल पोस्ट चा युपी सोबत काहीच संबंध नाही. असे कुठलेच आदेश देण्यात आले नाही.
त्यानंतर आम्ही हायर सेकंडरी एजुकेशन काउंसिल च्या जनसंपर्क अधिकारी लुइट पाठक यांना देखील संपर्क केला, त्यांनी देखील हि पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.

पुढच्या तपासात विश्वास न्यूज ने गुवाहाटी चे ईस्टमोजो चे पत्रकार नीलुत्पल तिमसीना यांना संपर्क केला, त्यांनी सांगितले कि आसाम मध्ये सरकारी नौकर्यांबाबत व्हायरल पोस्ट सारखी घटना घडली होती पण, विरोध होताच सरकार ने या निर्णयाला खारीज केले.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. सोशल सकॅनिंग मध्ये कळले कि फेसबुक यूजर राम अवतार युपी च्या पीलीभीत चे रहिवासी आहेत. प्रोफाइल मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे, यूजर बऱ्याच संगठनांचा भाग आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले. आसाम सरकार बद्दल ची जुनी पोस्ट आता उत्तर प्रदेश च्या नावाने व्हायरल होत आहे.

  • Claim Review : उत्तर प्रदेश मध्ये सरकारी नौकरी साठी स्पेशल परीक्षा
  • Claimed By : Ram Autar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later