X

Fact Check: फिल्म पठान ला घेऊन शाहरुख खान ने नाही केली हि अपील

शाहरुख खान ने फिल्म पठाण वरून कुठल्याही प्रकारची अपील लोकांकडे केलेली नाही. त्यांनी असे देखील म्हंटले नाही कि हा चित्रपट चालला नाही ता त्यांचे घर विकल्या जाईल.

  • By Vishvas News
  • Updated: August 20, 2020

नवी दिल्ली (विश्वास टीम): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा केला गेला आहे कि बॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांनी आपल्या फॅन्स ला अपील केली आहे कि त्यांनी त्यांच्या पठान चित्रपटाला हिट बनवावे, कारण जर का ती फ्लॉप झाली तर त्यांचे घर देखील विकल्या जाईल. सोशल मीडिया वर या पोस्ट वर काही लोकं कंमेंट करताना दिसून येतात, ज्यात ते चित्रपटाला बॉयकॉट करायचे मत मांडताना दिसतात. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. शाहरुख खान नि अशी कुठलीच अपील केली नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक वर “Justice for Sushant Singh Rajput #JFSSR” नावाच्या एका पेज वर शेअर केलेल्या पोस्ट वर लिहले होते: शाहरुख खान ने की भावुक अपील, उसकी फिल्म #पठान फ्लॉप हुईतो घर बिक जाएगा आईए घर बेचने में मदद करें #BOYCOTT PATHAN

अर्थात: शाहरुख खान ने केली भावुक अपील, त्यांचे फिल्म #पठान फ्लॉप झाली तर घर विकल्या जाईल. या घर विकण्यात मदत करू. #BOYCOTT PATHAN

पोस्ट चे अर्काइव्ह स्वरूप इथे बघा.

तपास:
व्हायरल दाव्याचा तपास आम्ही सगळ्यात आधी इंटरनेट वर केला. आम्ही केलेल्या दाव्यांबद्दल कुठे बातम्या मिळतात का ते बघितले. पण आम्हाला दाव्यांची पुष्टी होईल असे कुठलेच रिपोर्ट्स पडले नाहीत. शाहरुख खान एक मोठे अभिनेता आहेत आणि जर का त्यांनी अशी कुठली अपील केली असती तर त्याच्या बातम्या नक्कीच इंटरनेट वर सापडल्या असत्या.

आम्ही शाहरुख खान चे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट बघितले त्यावर पण आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही. शाहरुख खान वास्तविक बघता सोशल मीडिया वर बरेच ऍक्टिव्ह असतात. त्यांनी स्वातंत्र्य दिवसाची (१५ ऑगस्ट) रोजी आपल्या तिन्ही सोशल मीडिया अकाउंट्स वर पोस्ट केले होते.

विश्वास न्यूज ने शाहरुख खान च्या प्रोडक्शन हाउस रेड चिलीज चे स्पोक्सपर्सन यांच्या सोबत संपर्क केला, त्यांनी हे सगळे दावे खारीज केले आणि विश्वास न्यूज ला सांगितले कि अशी कुठलीच अपील शाहरुख खान यांनी केली नाही.

मीडिया रिपोर्ट्स वरून आपण हा अंदाज लावू शकतो कि, शाहरुख खान हे यश राज फिल्म्स च्या बॅनर मध्ये बनणाऱ्या सिद्धार्थ आनंद निर्देशित ‘पठान’ या चित्रपटाची शूटिंग या वर्षी नोव्हेंबर मध्ये सुरु करू शकतात. मीडिया रिपोर्ट्स वरून आपण हा अंदाज लावू शकतो कि, शाहरुख खान हे यश राज फिल्म्स च्या बॅनर मध्ये बनणाऱ्या सिद्धार्थ आनंद निर्देशित ‘पठान’ या चित्रपटाची शूटिंग या वर्षी नोव्हेंबर मध्ये सुरु करू शकतात.

फेसबुक वर हि पोस्ट “Justice for Sushant Singh Rajput #JFSSR” या पेज वर ‘अभिषेक राजेश्वर सिंह परमार’ या नावाच्या इसमाने शेअर केली होती. जेव्हा आम्ही या पेज चा तपास केला तेव्हा आम्हाला असे कळले कि हा पेज २२ जून २०२० रोजी बनवण्यात आला होता. या पेज ला तीन लाख पेक्षा अधिक लोक फोल्लो करतात.

निष्कर्ष: शाहरुख खान ने फिल्म पठाण वरून कुठल्याही प्रकारची अपील लोकांकडे केलेली नाही. त्यांनी असे देखील म्हंटले नाही कि हा चित्रपट चालला नाही ता त्यांचे घर विकल्या जाईल.

  • Claim Review : शाहरूख खान ने की भावुक अपील,उसकी फ़िल्म #पठान फ्लॉप हुई तो घर बिक जाएगा आईए घर बेचने में मदद करे #BOYCOTT PATHAN
  • Claimed By : Justice for Sushant Singh Rajput #JFSSR
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later