X

Fact Check: गुजरात चे चित्र अयोध्याच्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट चा दावा बनावट असल्याचे सिद्ध झाले. अयोध्येचा सांगून व्हायरल होणार फोटो गुजरातचा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: December 28, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये गदा आणि बाण-धनुष्याची कलाकृति एका चौकात पाहायला मिळते. इंटरनेटवर यूजर्स या फोटोला अयोध्याचे सांगून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल झालेली पोस्ट तपासली असता ती दिशाभूल करणारी असल्याचे समजले. गुजरातमधील वडोदरा येथील गाडा सर्कलचे चित्र काही लोकं अयोध्याचे सांगून व्हायरल करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?
We Support Hindutva या फेसबुक पेजने २१ डिसेंबर रोजी एक छायाचित्र पोस्ट केले. यामध्ये रस्त्याच्या मधोमध गदा आणि बाण धनुष्याची रचना पाहायला मिळते. दावा केला: ‘जय श्री राम अयोध्‍या में निर्मित दिव्‍य चौराहा देखकर खुशी हुई तो एक बार जय श्री राम का जयकारा लगाए।’

फेसबुक पोस्टचा मजकूर खरा असल्याचे गृहीत धरून इतर यूजर्स देखील ते व्हायरल करत आहेत. पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
अयोध्येच्या नावाने व्हायरल झालेल्या प्रतिमेची सत्यता जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम ऑनलाइन टूल्स चा वापर केला. गुगल रिव्हर्स इमेज टूलमध्ये इमेज अपलोड करून सर्च केल्यानंतर आम्हाला अनेक ठिकाणी ही इमेज सापडली. एका फेसबुक पेजने 11 जून 2020 रोजी ही प्रतिमा अपलोड केली होती, ज्याचे वर्णन वडोदरातील हर्णी रोडचे छेदनबिंदू असे दिले होते.

या आधारावर विश्वास न्यूजने गुगलमध्ये संबंधित कीवर्ड टाइप करून अधिक सर्च केले. आम्हाला एका वेबसाइटवर दुसऱ्या अँगल ने व्हायरल चित्र पोस्ट केलेले मिळाले. वडाडेरा विमानतळ रोड असल्याचे ह्या हिसेबसाइट वर सांगण्यात आले. हि पोस्ट इथे बघा.

विश्वास न्यूजने तपास पुढे नेण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. संबंधित कीवर्डसह शोधल्यावर, आम्हाला हे वर्तुळ वडोदराच्या एअरपोर्ट रोडवर आढळले. त्यासाठी नकाशावर जाऊन स्ट्रीट व्ह्यूची मदत घेतली. व्हायरल झालेले चित्र असलेली प्रतिमा इथे बघा.

तपासाच्या पुढील टप्प्यात विश्वास न्यूजने अयोध्येमध्ये संपर्क केला. आम्हाला जाणून घ्यायचे होते की अयोध्येतही अशी प्रतिमा आहे का? या व्हायरल पोस्टला बनावट असल्याचे सांगत दैनिक जागरण, अयोध्याचे ब्युरो चीफ रामा शरण अवस्थी म्हणाले की, ही पोस्ट खोटी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल पोस्ट चा दावा बनावट असल्याचे सिद्ध झाले. अयोध्येचा सांगून व्हायरल होणार फोटो गुजरातचा आहे.

  • Claim Review : अयोध्या चे चित्र
  • Claimed By : फेसबुक पेज We support hindutva
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later