X

Fact Check: हा अल्बिनो वटवाघूळ नाही, सॉफ्ट टॉय आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेले वटवाघुळाचे छायाचित्र हे खरे नसून तो एक सॉफ्ट टॉय आहे ज्याला एका रुस च्या कलाकाराने बनवले आहे. खरे अल्बिनो वटवाघूळ असे दिसत नाहीत.

  • By Vishvas News
  • Updated: July 1, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात एक पांढऱ्या रंगाचा वटवाघूळ दिसतो. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हा खरा वटवाघूळ आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि हा एक खरा वटवाघूळ नसून, एक सॉफ्ट टॉय आहे, ज्याला एका कलाकाराने बनवले आहे. खरे अल्बिनो वटवाघूळ असे दिसत नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Mindless ने हि पोस्ट शेअर केली, याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: Meet the lovely Albino Bat Soooo Cute na ?????
हा पोस्ट आणि याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स  इमेज पासून केली. आम्ही व्हायरल छायाचित्राचा तपास घेतला. आम्हाला हे आणि असे काही छायाचित्र www.etsy.com वर मिळाले.

इथे मिळालेल्या माहिती प्रमाणे, हे yastanna नावाच्या एका कलाकाराने बनवले आहे. आम्ही या साईट द्वारे त्यांना संपर्क केला आणि छायाचित्रातील वटवाघुळाबद्दल विचारणा केली. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे वटवाघूळ त्यांनी बनवलेला खेळणं आहे. त्यांनी सांगितले कि त्यांचे पूर्ण नाव, यस्त्रेज़ेमबोव्स्काया आहे आणि ते रुस चे रहिवासी आहेत.

आम्हाला व्हायरल छायाचित्र त्यांच्या इंस्टाग्राम वर देखील मिळाले.

अल्बिनो वटवाघुळाबद्दल अधिक माहिती करता आम्ही प्रसिद्ध कायरोपटेरोलॉजिस्ट (Chiropterologist ) भार्गवी श्रीनिवास यांना संपर्क केला, त्यांनी छायाचित्र पाहून सांगितले कि हा अल्बिनो वटवाघूळ नाही. वटवाघूळांची फिजियोलॉजी वेगळी असते. कोणत्याच प्रजातीचा चेहऱ्याचा आकार गोल नसतो. हे खरे आहे कि वटवाघूळ देखील अल्बिनो असतात पण हा खरा अल्बिनो वटवाघूळ नाही.

खऱ्या अल्बिनो वटवाघुळाचे छायाचित्र खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

फेसबुकवर हि पोस्ट Mindless नावाच्या यूजर ने शेअर केली होती. या प्रोफाइल चे स्कँनिंग केल्यावर कळले कि यूजर चे  7.5K फ़ॉलोअर्स आहेत.


निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेले वटवाघुळाचे छायाचित्र हे खरे नसून तो एक सॉफ्ट टॉय आहे ज्याला एका रुस च्या कलाकाराने बनवले आहे. खरे अल्बिनो वटवाघूळ असे दिसत नाहीत.

  • Claim Review : अल्बिनो वटवाघुळाचे छायाचित्र
  • Claimed By : Mindless
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later