X

Fact Check: व्हायरल चित्रात ऑटो सोबत उभे असलेले महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही, व्हायरल दावा खोटा

विश्वास न्यूज च्या तपासात ऑटो सोबत उभ्या असलेल्या व्हायरल चित्रात महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून बाबा कांबळे आहेत असे कळले. व्हायरल दावा खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: July 26, 2022

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक दावा सोशल मीडिया वर एक दावा व्हायरल होत आहे. छायाचित्रात एक व्यक्ती एका ऑटो समोर उभा असलेला दिसतो. बरेच सोशल मीडिया यूजर्स असा दावा करत आहे कि ह्या चित्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि चित्रात दिसत असलेला व्यक्ती एकनाथ शिंदे नसून, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे संस्थापक अध्यक्ष, बाबा कांबळे आहेत.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Swathi Bellam ने व्हायरल चित्र ट्विट केले आणि लिहले: #EknathShinde the CM of Maharashtra
This is stupendous achievement

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात, हे चित्र नीट निरखून पाहून केले. ह्या चित्रात ऑटो च्या नंबर प्लेट वर ‘MH 14 8172’ असे लिहलेले दिसते.

आम्ही MH 14 कुठला आरटीओ कोड आहे हे तपासले. आम्हाला कळले कि हा महाराष्ट्रातील, पुणे मधील पिंपरी चिंचवड चा आहे. पण असे लक्षात घेतले पाहिजे कि महाराष्ट्र मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत.

आम्ही त्यानंतर व्हायरल चित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले. आम्हाला असे बरेच प्रोफाईल्स फेसबुक वर सापडले ज्यांनी हे चित्र अपलोड करून असे लिहले होती कि चित्रातले व्यक्ती, बाबा कांबळे आहेत.

ह्यातून आम्हाला कळले कि चित्रातला व्यक्ती एकनाथ शिंदे नसून बाबा कांबळे आहेत.

विश्वास न्यूज ने त्यानंतर फेसबुक वर किवर्डस वापरून सर्च केले.

आम्हाला त्यानंतर एक फेसबुक पेज सापडला, ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे‘ ह्यावर देखील हे चित्र अपलोड केले होते आणि लिहले होते: महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा रिक्षा सोबत फोटो रिक्षा चालवताना 19 97 सालीचा रिक्षा चालवत असतानाचा हा फोटो आहे
” श्रावण मधे रिक्षा पूजा करतानाचा,
पिंपरी रातराणी रिक्षा स्टॅन्ड

आता हे स्पष्ट होते कि चित्रात एकनाथ शिंदे नसून बाबा कांबळे आहेत.

विश्वास न्यूज ने पुढच्या टप्प्यात, एकनाथ शिंदे ह्यांचे मीडिया कोऑर्डिनटोर, विराज मूळे ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे चित्र एकनाथ शिंदे ह्यांचे जुने चित्र नाही. व्हायरल दावा खोटा आहे.

त्यानंतर आम्ही बाबा कांबळे ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि ह्या चित्रात तेच आहेत. “हे चित्र 1997 साली, रातराणी रिक्षा स्टॅन्ड वर श्रावणाच्या पूजे दरम्यान घेण्यात आले होते जे पिंपरी चिंचवड, पुणे मध्ये आहे. नुकतेच माझ्यावर एका मराठी वृत्तपत्रानी बातमी केली तेव्हा पासून हे चित्र एकनाथ शिंदे ह्यांचे सांगून व्हायरल होत आहे,” असे बाबा कांबळे ह्यांनी सांगितले.

शेवटी विश्वास न्यूज ने दावा शेअर करणाऱ्या ट्विटर यूजर चा तपास केला. त्यात कळले कि Swathi Bellam ह्यांनी 2020 साली ट्विटर जॉईन केले. त्यांना 3,621 लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात ऑटो सोबत उभ्या असलेल्या व्हायरल चित्रात महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून बाबा कांबळे आहेत असे कळले. व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : #EknathShinde the CM of Maharashtra This is stupendous achievement
  • Claimed By : Swathi Bellam
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later