X

Fact Check: Jio Mart ची फ्रेंचाइजी वाटण्याच्या नावावर चालणार पेज खोटा आहे, कंपनी च्या नावावर लोकांना ठगल्या जात आहे

  • By Vishvas News
  • Updated: August 31, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): रिलायंस कडून जियो मार्ट लाँच केल्यानंतर त्याच्या फ्रेंचाइजी वाटण्यावरून लोकांना ठगण्याचा प्रयन्त करण्यात येत आहे. ‘Jiomart Franchise’ च्या नावाने एका फेसबुक पेज वर जियो मार्ट च्या फ्रैंचाइजी साठी अर्ज करण्यास फॉर्म दिला गेला आहे.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. जियो मार्ट च्या फ्रेंचाइजी च्या नावावर चालणार फेसबुक पेज बनावटी आहे. कंपनी कडून सध्या अशी कुठलीच डिलरशिप किंवा फ्रेंचाइजी देण्यात येत नाही आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज (आर्काइव लिंक) Jiomart Franchise’ वर फ्रेंचाइजी करता अर्जाची अपील केली गेली आहे. sites.google.com/view/jiomartfranchise/apply-no (फॉर्म ची आर्काइव लिंक) वर क्लिक करून अर्जासाठी फॉर्म भरण्याची अपील केली जात आहे.

तपास:
ब्लूमबर्ग च्या रिपोर्ट प्रमाणे, २४ मे ला रिलायंस ने देशव्यापी स्तरावर जियो मार्ट पोर्टल ची टेस्टिंग सुरु केली होती. या नंतर आम्ही जियो मार्ट ची वेबसाईट तपासली. सर्च मध्ये आम्हाला, www.jiomart.com हि वेबसाईट सापडली.

वेबसाईट च्या About Us सेक्शन मध्ये आम्हाला कंपनी चा ई-मेल आयडी मिळाला, जो cs@jiomart.com या नावानी आहे.

जियो मार्ट च्या ओरिजिनल वेबसाईट चा ऍड्रेस आहे, www.jiomart.com आणि ई-मेल आयडी cs@jiomart.com, जेव्हाकी व्हायरल होत असलेल्या मेसेज मध्ये, फ्रेंचाइजी अर्ज मागवण्याकरिता, ‘jiomartfranchiseapply@gmail.com’ या नावाची ई-मेल आयडी दिलेली आहे.

जियो चे प्रवक्ता यांनी विश्वास न्यूज सोबत संवाद साधत सांगितले, “gmail.com ने संपणारी कुठलीच ई-मेल आयडी आम्ही वापरत नाही. जियो मार्ट सध्या कुठल्याच प्रकारची फ्रेंचाइजी देत नाही आहे. आणि कुठल्याच व्यक्ती किंवा संस्थे ला त्यासाठी नियुक्त देखील केलेले नाही. त्याच प्रमाणे फ्रेंचाइजी करता आम्ही कुठल्याच व्यक्ती कडून कुठलीच रक्कम वसूल करत नाही.”

फेसबुक पेज वर दिलेल्या नंबर वर आम्ही फ्रेंचाइजी घेण्यास इकचुक व्यक्ती म्हणून कॉल केला. त्यांच्याकडून आम्हाला वॉट्सऐप वर एक मेसेज आला आणि त्यांनी आम्हाला काही कागदपत्र मागितले. आम्ही हा मेसेज जियो च्या प्रवक्तांना पाठवला.

प्रवक्त्यांनी म्हंटले, “हे संपूर्णपणे ठगण्याचा प्रयत्न आहे. या पेज वर कारवाई करण्यास आम्ही संबंधित टीम ला पाठवण्यात आले आहे.” त्यांनी आम्हाला सांगितले कि लोकांना ठगण्यास जियो मार्ट च्या नावासोबत मिळत्या-जुळत्या बऱ्याच वेबसाईट बनवण्यात आल्या आहेत. आम्ही लोकांना अपील करतो कि अश्या कुठल्यासच वेबसाईट ला बाली पडू नका. जियो मार्ट ची अधिकृत वेबसाईट www.jiomart.com आहे.

न्यूज सर्च मध्ये आम्हाला अशे बरेच आर्टिकल मिळाले, ज्यात रिलायंस रिटेल कडून अश्या बनावटी वेबसाईट कडून लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. News18 च्या वेबसाईट वर २७ ऑगस्ट ला प्रकाशित झालेल्या रिपोर्ट प्रमाणे, रिलायंस रिटेल नि जियो मार्ट च्या नावाने चालणाऱ्या खोट्या वेबसाईट पासून ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

रिलायंस इंडस्ट्रीज च्या वेरिफाइड फेसबुक पेज वर पण या वरून स्पष्टीकरण देण्यात आले होते. दिलेल्या व्हिडिओ मध्ये सांगणात आले आहे, “जियो मार्ट ची अधिकृत वेबसाईट www.jiomart.com आहे, आम्ही सध्या कुठल्याही फ्रेंचाइजी मॉडल ला ऑपरेट करत नाही आहे.

https://www.facebook.com/watch/?v=836328150104743

रिलायंस कडून काही अश्याच खोट्या नावाच्या वेबसाईट्स ला सार्वजनिक केले गेले आहे, जे जियो मार्ट च्या नावानी मिळते जुळते आहे.

1. jmartfranchise.in

2.Jiomartfranchiseonline.com

3.jiodealership.com

4.jiomartsfranchises.online

5.jiomartfranchises.com

6.jiomart-franchise.com

7.jiomartshop.info

8.jiomartindia.in.net

9.jiomartreliance.com

10.jiomartfranchise.co

जियो च्या प्रवक्तानि आम्हाला सांगितले, ‘हे त्या वेबसाईट्स चे नावं आहेत, ज्यांच्याबद्दल आम्हाला माहिती आहे ज्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. त्याच सोबत आमची लोकांना विनंती आहे कि अश्या कुठल्यापण वेबसाईट ची माहिती मिळाल्यावर IP.legal@ril.com वर त्याची माहिती देऊ शकता.

जियो मार्ट ची फ्रैंचाइजी देणारा पेज फेसबुक वर ५ ऑगस्ट २०२० रोजी बनला, त्याला ४२ लोक फोल्लो करतात.

निष्कर्ष: जियो मार्ट च्या फ्रेंचाइजी करता अर्जाची अपील करणारा फेसबुक पेज, ‘Jiomart Franchise’ खोटा आहे. जियो मार्ट कडून असा कुठलाच ऑफर सध्या सुरु नाही.

  • Claim Review : जियो मार्ट च्या फ्रैंचाइजी साठी अर्ज
  • Claimed By : Jiomart Franchise
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later