X

Fact Check: जो बायडेन च्या शपथ ग्रहण समारोहात नाही चालले मनमोहन सिंह, व्हायरल पोस्ट खोटी आहे

  • By Vishvas News
  • Updated: November 16, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): अमेरिका च्या राष्ट्रपती निवडणुकांच्या निकालात जो बायडेन यांचा विजय झाला, त्यानंतर सोशल मीडिया वर एक दावा व्हायरल होत आहे. काही भारतीय सोशल मीडिया यूजर दावा करत आहेत कि भारताचे पूर्व पंतप्रधान, डॉक्टर मनमोहन सिंह हे जो बायडेन यांच्या राष्ट्रपती शपथ ग्रहण समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून भाग घेतील. विश्वास न्यूज ने या दाव्याचा तपास केला आणि त्यात हा दावा खोटा ठरला. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कार्यालयाने या दाव्याचे खंडन केले आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Rakesh patel ने ९ नोव्हेंबर रोजी पूर्व पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे छायाचित्र अपलोड करून लिहले, “अमेरिका के नए राष्ट्रपति बाईडन के शपथ ग्रहण समारोह के मुख्य अतिथि होंगे डॉ.मनमोहन सिंह जी
अर्थात: अमेरिकेच्या नवीन राष्ट्रपती जो बायडेन यांच्या शपथ ग्रहण समारोहाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मनमोहन सिंह जी उपस्थित राहतील.

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
अमेरिकेमध्ये नुकतेच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये, डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन ने डोनाल्ड ट्रम्प यांना हरवले. डोनाल्ड ट्रम्प ला हरवून व्हाईट हाऊस मध्ये जागा मिळवणारे जो बायडेन हे आतापर्यंतचे सगळ्यात वयस्कर राष्ट्रपती राहतील. बायडेन हे, वयाच्या ७७ वर्षी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती राहतील.

बायडेन जिंकल्यानंतर भारतीय यूजर सोशल मीडिया वर एक दावा व्हायरल करत आहेत, ज्यात सांगण्यात येत आहे कि भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह हे, बायडेन यांच्या शपथ ग्रहण समारोहात सहभागी होणार आहे. हि खरंच एक मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही या दाव्याचा तपास करायचे ठरवले. आम्हाला आमच्या तपासात अशी कुठलीच बातमी मिळाली नाही ज्यात दावा केला असेल कि मनमोहन सिंह हे जो बायडेन यांच्या शपथ ग्रहण समारोहात सहभागी होणार आहेत. पण आम्हाला अश्या अनेक बातम्या आणि लिंक मिळाल्या ज्या या दाव्याचे खंडन करत होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही, डॉ मनमोहन सिंह यांच्या कार्यालयात संपर्क केला. सिंह यांच्या कार्यालयाने या दाव्याचे खंडन केले आणि म्हंटले, “आम्हाला मागील काही दिवसांपासून या दाव्याला घेऊन बरेच फोन येऊन गेले. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो कि व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. डॉ सिंह यांना अजून पर्यंत कुठलेच निमंत्रण आले नाही.”

दैनिक जागरण च्या सहयोगी वृत्तपत्र, नई दुनिया मध्ये प्रकाशित एका बातमी प्रमाणे, जो बायडेन पुढच्या वर्षी २० जानेवारी रोजी राष्ट्रपती म्हणून व्हाईट हाऊस मध्ये सत्ता मिळाल्यानंतर काम सांभाळतील. ७८ वर्षात हे पद सांभाळणारे बायडेन हे सगळ्यात वयस्कर राष्ट्रपती राहतील. ते आतापर्यंत दोन वेळा अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते. भारतीय वंशज कमला हॅरिस ह्या पुढच्या उपराष्ट्रपती राहतील. त्या पहिल्या अश्वेत महिला आहेत ज्यांची या पदावर निवड झाली आहे. बायडेन हे राष्ट्रपती निवडले गेले आहे.

या दाव्याला व्हायरल करणाऱ्या फेसबुक पेज, “Rakesh patel” यांना ३,८४३ लोकं फॉलो करतात आणि हा पेज २१ एप्रिल २०१९ रोजी बनवला गेला होता. त्यांनी दिलेल्या इंट्रो प्रमाणे ते एका विशिष्ट राजनेतिक पार्टी सोबत जोडले गेले आहे.

निष्कर्ष: जो बायडेन यांच्या शपथ ग्रहण सोहळ्यात डॉ मनमोहन सिंह जाणार असल्याचा दावा विश्वास न्यूज च्या तपासात खोटा ठरला.

  • Claim Review : डॉ मनमोहन सिंह, जो बायडेन यांच्या शपथ ग्रहण समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
  • Claimed By : Rakesh patel
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later