X

Fact Check: पीएम मोदी यांच्याबद्दल नीरज चोपडा यांनी नाही केले ट्विट, फेक पोस्ट होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात नीरज चोपडा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे सिद्ध झाले.

  • By Vishvas News
  • Updated: August 12, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): टोक्‍यो ओलंपिक मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारे नीरज चोपडा यांच्या नावाने एक खोटा ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विट ला खरे मानून सोशल मीडिया यूजर्स याला व्हायरल करत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट ज्या ट्विटर हॅन्डल वरून व्हायरल झाला तो अस्तित्वात नाही. नीरज यांचा ट्विटर हॅन्डल वेरिफाइड आहे. नीरज चोपडा यांचा व्हायरल ट्विट खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर उमेश सिंह ने दहा ऑगस्ट रोजी एक पोस्ट केले आणि लिहले:  ‘क्रेडिट लेने का ऐसा होड़ है कि खिलाड़ी को ऐसे ट्वीट करना पर रहा है। बेशर्म सत्ता।’
फेक ट्विट मध्ये नीरज चोपडा यांचे चित्र वापरून लिहले आहे:  ‘ये गोल्‍ड मेडल मेरी और मेरे कोच की वर्षों मेहनत का नतीजा है। मोदी जी को इसका क्रेडिट देने की कोशिश न करें।’

व्हायरल पोस्ट मधला कन्टेन्ट जसाच्या तास इथे लिहला आहे. हि फेसबुक पोस्ट आणि याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. ह्याला खरे मानून बाकी लोकं देखील याला व्हायरल करत आहेत.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास सुरु करत,  व्हायरल ट्विट मध्ये वापरल्या गेलेला ट्विटर हॅन्डल  सर्च केला, @ i_m_nirajchopra ह्या नावाचा आम्हाला ट्विटर हॅन्डल मिळाला नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्हाला कळले कि नीरज चोपडा यांचा वेरिफाइड हॅन्डल @Neeraj_chopra1 असा आहे. हा अकाउंट जून 2017 मध्ये बनवला गेला. ऑगस्ट महिन्यात नीरज ह्यांनी एकाच ट्विट केला होता, हा ट्विट इथे बघा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण चे स्‍पोर्ट्स एडिटर अभिषेक त्रिपाठी ह्यांना संपर्क केला. त्यांच्या सोबत आम्ही व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी सांगितले कि व्हायरल होत असलेला ट्विट हा त्यांच्या खऱ्या अकाउंट वरून करण्यात आला नाही. हि पोस्ट खोटी आहे.

आता आम्ही फेसबुक यूजर ज्यांनी हि पोस्ट शेअर केली त्यांचा तपास केला. फेसबुक यूजर उमेश सिंह एका राजनेतिक संघटनेशी निगडित आहेत. ते पटना चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात नीरज चोपडा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे सिद्ध झाले.

  • Claim Review : नीरज चोपडा यांचा ट्विट
  • Claimed By : फेसबुक यूजर उमेश सिंह
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later