X

Fact Check: मुंबई च्या खड्ड्यांच्या रस्त्याचे जुने चित्र, वाराणसी च्या नावाने होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट सोबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काही लोकं मुंबई चे जुने चित्र वाराणसी चे सांगून आता व्हायरल करत आहेत.

  • By Vishvas News
  • Updated: September 16, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया च्या विविध वेबसाईट वर एका रस्त्याचे चित्र व्हायरल होत आहे. ह्यात खूप सारे खड्डे बघितल्या जाऊ शकतात. यूजर्स दावा करत आहे कि हे चित्र वाराणसी चे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि ह्या चित्राचा वाराणसी सोबत काही संबंध नाही. मुंबई चे जुने छायाचित्र काही लोकं खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहे. हे चित्र काढणाऱ्या फोटोग्राफर एसएल सनत कुमार ने विश्वास न्यूज ला सांगितले कि हे चित्र जुने आहे आणि मुंबई चे आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर शशांक सिंह ने 4 सप्टेंबर रोजी एक चित्र पोस्ट केले आणि लिहले: “नासा के सेटेलाइट ने बताया कि चाँद पर लोग आते जाते देखे जा रहे हैं, लेकिन PWD ने खंडन करते हुए कहा कि यह वाराणसी की उनकी सड़क है…

ह्याला खरे मानून लोकं व्हायरल करत आहे. फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने वाराणसी च्या नावावर व्हायरल होत असलेल्या चित्राचे तपास सुरु केले, आधी गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये चित्र अपलोड करून आम्ही त्याला शोधण्यास सुरु केले. ह्यात आम्हाला कळले कि मागील काही वर्षात हे चित्र विविध जागेचे म्हणून शेअर करण्यात आले आहे. हे चित्र टाइम्‍स ऑफ इंडिया चे फोटोग्राफर एसएल सनत कुमार ह्यांनी हे चित्र क्लिक केले आहे. इथे पूर्ण बातमी इथे वाचा.

व्हायरल चित्र टाइम्‍स ऑफ इंडिया, मुंबई ला 23 जुलै 2017 रोजी पब्लिश झाला होता. हा रास्ता, मुंबई च्या प्रतीक्षा नगर चा आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने फोटोग्राफर एसएल सनत कुमार ह्यांना संपर्क केला. त्यांनी इंस्टाग्राम द्वारे आम्हाला सांगितले कि हे मुंबई चे जुने चित्र आहे. हे चित्र त्यांनी क्लीक केले आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही व्हायरल फेसबुक यूजर चा तपास केला. आम्हाला त्यात कळले कि यूजर वाराणसी चा रहिवासी आहे. आणि त्यांनी हा अकॉउंट 2015 मध्ये बनवला. त्यांना 1217 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट सोबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काही लोकं मुंबई चे जुने चित्र वाराणसी चे सांगून आता व्हायरल करत आहेत.

  • Claim Review : वाराणसी चा रास्ता
  • Claimed By : फेसबुक यूजर शशांक सिंह
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later