Fact Check: ऋषी सुनक चे दोन वर्ष जुने चित्र ह्या वर्षी च्या दिवाळी चे सांगून व्हायरल
ऋषी सुनक यांचा दिवाळीनिमित्त दिवा लावतानाचा हा फोटो सुमारे दोन वर्षे जुना आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी त्यांच्या घराबाहेर दिवे लावले होते. या फोटोचा अलीकडच्या काळाशी काहीही संबंध नाही.
- By Vishvas News
- Updated: October 26, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही यूजर हे शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की ऋषी सुनक यांनी आज यूके संसदेच्या दारात दिवा लावला.
विश्वास न्यूजला तपासात असे आढळून आले की, व्हायरल झालेला फोटो सुमारे दोन वर्षे जुना आहे, त्याचा अलीकडच्या काळाशी काहीही संबंध नाही. नोव्हेंबर 2020 मध्ये, ऋषी सुनक यांनी लंडनमधील त्यांच्या घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढली आणि चार दिये पेटवले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Parmanand Choudhary (आर्काइव्ह लिंक) ने 24 ऑक्टोबर रोजी चित्र शेअर करून लिहले,
200 साल की गुलामी का जवाब आज एक भारतीय मूल के ऋषि सुनक ने ब्रिटेन की संसद के दरवाजे पर जलाया दीप!!!
दीपावली के पावन दिन पर आज ऋषि सनक ब्रिटेन के प्रधानमंत्री बने।
ऋषि सनक को बधाई और शुभकामनाएं।
जय श्री राम

तपास:
व्हायरल फोटो शोधण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने तो शोधला. आम्हाला हा फोटो 13 नोव्हेंबर 2020 रोजी rediff.com वर प्रकाशित झालेल्या बातमीत सापडला. ह्यात असे लिहिले होते की 40 वर्षीय भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी दिवाळीनिमित्त त्यांच्या 11 डाउनिंग स्ट्रीट निवासस्थानाबाहेर दिवे लावले. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी त्यांचे लग्न झाले आहे.

द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातही व्हायरल चित्रासारखाच एक फोटो दाखवण्यात आला होता. रिपोर्ट प्रसिद्ध होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पाच दिवसीय दीपोत्सवाच्या सुरुवातीला ऋषी सुनक यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर दिवे लावले.

अधिक माहितीसाठी, आम्ही लंडनस्थित पत्रकार नाओमी कैंटन ह्यांच्यासोबत संपर्क साधला. ते म्हणतात, ‘हा नोव्हेंबर 2020 चा फोटो आहे, जेव्हा ते कुलपती होते. हा 11 क्रमांकाच्या बाहेरचा फोटो आहे, जिथे कुलपती राहतात. काल रात्री डाऊनिंग स्ट्रीटवर प्रकाश नव्हता कारण तोपर्यंत सुनकची अधिकृत घोषणा झाली नव्हती.
25 ऑक्टोबर 2022 रोजी news.sky.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ऋषी सुनक आता अधिकृतपणे पंतप्रधान बनले आहेत.

जुना फोटो शेअर करणाऱ्या फेसबुक युजर ‘परमानंद चौधरी’चे प्रोफाइल आम्ही स्कॅन केले. तो सप्टेंबर 2011 पासून फेसबुकवर सक्रिय आहे आणि एका विचारसरणीने प्रेरित आहे.
निष्कर्ष: ऋषी सुनक यांचा दिवाळीनिमित्त दिवा लावतानाचा हा फोटो सुमारे दोन वर्षे जुना आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी त्यांच्या घराबाहेर दिवे लावले होते. या फोटोचा अलीकडच्या काळाशी काहीही संबंध नाही.
- Claim Review : ऋषी सुनक ह्यांचे आताचे छायाचित्र.
- Claimed By : Parmanand Choudhary
- Fact Check : Misleading

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
-
Whatsapp 9205270923
-
Email-Id contact@vishvasnews.com