X

Fact Check: JNU मध्ये पाकिस्तान विरोधी नारे लागले, या दाव्यासोबत व्हायरल होत असलेला व्हिडिओ २०१८ मधला ठाण्यातील गणपती विसर्जन चा आहे

  • By Vishvas News
  • Updated: November 24, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये लोकांची गर्दी दिसते, त्यात लोकं भगवा ध्वज घेऊन पाकिस्तान च्या विरोधात नारेबाजी करत असताना दिसतात. दावा केला जात आहे कि हा व्हिडिओ जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (JNU) चा आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा चुकीचा ठरला. जेएनयू च्या नावाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ठाण्यामध्ये झालेल्या गणपती विसर्जन चा आहे, जो आता चुकीच्या दाव्यांसह सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Save Hinduism’ ने व्हायरल व्हिडिओ (आर्काइव्ह लिंक) शेअर केले आणि दावा केला कि हा व्हिडिओ जेएनयू मध्ये झालेल्या नारेबाझी चा आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये लोकांची गर्दी दिसते, जे भगवा ध्वज हातात घेऊन पाकिस्तान विरोधी नारेबाजी करत आहे.

सोशल मीडिया वर बऱ्याच यूजर्स ने याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

तपास:
व्हायरल व्हिडिओ च्या ओरिजिनल सोर्स ची माहिती लावण्यासाठी आम्ही InVID टूल्स ची मदत घेतली. त्यात आम्हाला की फ्रेम्स मिळाले, ज्यांना आम्ही गूगल रिव्हर्स इमेज चा वापर करून सर्च केले. सर्च मध्ये आम्हाला हा व्हिडिओ ‘LIMRA TIMES‘ नावाच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेला मिळाला.
४ ऑक्टोबर २०१८ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ मध्ये सांगितले गेले होते कि, हा ठाण्याचा व्हिडिओ आहे जिथे पाकिस्तान विरोधी नारे लावले गेले.

या व्हिडिओ मध्ये एका रिपोर्टर चा नंबर देखील दिला गेला आहे. ह्या नंबर पर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही म्हणून त्यांच्या सोबत संपर्क हू शकला नाही. व्हिडिओ सोबत मिळालेले कीवर्डस वापरून आम्ही सोशल मीडिया वर त्यांना सर्च केले. सर्च मध्ये आम्हाला हा व्हिडिओ फेसबुक यूजर, ‘Akshay Sawant’ यांच्या प्रोफाइल वर मिळाला, ज्याला त्यांनी २३ सप्टेंबर २०१८ रोजी लाईव्ह रेकॉर्ड केले होते. या व्हिडिओ ला शेअर करून त्यांनी लिहले होते, ‘Hindu Jagruti Visarjan Miravnuk.’
विश्वास न्यूज ने अक्षय सावंत यांच्या सोबत फेसबुक वर चर्चा केली. त्यांनी सांगितले, ‘हा व्हिडिओ ठाणे येथे झालेल्या गणपती विसर्जनाचा आहे.’

इथे मिळालेल्या कीवर्डस च्या आधारावर सर्च केल्यावर आम्हाला युट्युब वर ‘Chetan Ware‘ यांच्या नावावर २९ सप्टेंबर २०१८ रोजी अपलोड केलेला व्हिडिओ मिळाला, जो व्हायरल व्हिडिओ चा मोठा व्हर्जन आहे. दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ ठाणे वेस्ट मध्ये २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या गणपती विसर्जनाचा आहे.

आम्ही या व्हिडिओ संबंधात JNUSU चे वाईस प्रेसिडेंट साकेत मून यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे विश्वास न्यूज ला सांगितले.
जेएनयू मधून नुकतेच उत्तीर्ण झालेले आणि आपल्या पीएचडी च्या प्रवेशाची वाट बघत असलेले एक विद्यार्थी विकास पटेल यांच्यासोबत देखील आम्ही संवाद साधला, त्यांनी देखील सांगितले कि हि घटना जेएनयू ची नाही.

या व्हिडिओ मध्ये खूप लोकं एकत्रित झाले आहे आणि बिना मास्क चे दिसतात, याचा अर्थ हा व्हिडिओ कोरोनाव्हायरस महामारी च्या वेळचा नाही.
व्हायरल व्हिडिओ खोट्या दाव्यानी शेअर करणाऱ्या पेज ला पाच हजार लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: जेएनयू मध्ये पाकिस्तान विरोधी नारे लागले, या दाव्यासह व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा २०१८ मध्ये ठाण्यात झालेल्या गणपती विसर्जन चा आहे, जो आता सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

  • Claim Review : JNU मध्ये पाकिस्तान विरोधी नारे लागले
  • Claimed By : Save Hinduism
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later