X

Fact Check: मोफत टॅबलेट डिवाइस द्यायच्या नावावर घेत आहेत तुमची पर्सनल माहिती, अश्या लिंक वर क्लीक करू नये

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचे समजले. कोणत्या पण लिंक वर क्लीक करण्याच्या आधी त्याचा पूर्ण तपास करावा.

  • By Vishvas News
  • Updated: December 15, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप चॅट बोट वर एक क्लेम तथ्य तपासणी करता यूजर्स ने पाठवला ज्यात फुकट टॅबलेट डिवाइस देण्याचा दावा करण्यात येत आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात समजले कि हा मेसेज खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप हेल्पलाईन नंबर 95992 99372 वर हा मेसेज फॅक्ट चेक करता मिळाला.

तपास:
व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेल्या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी गूगल वर कीवर्डस च्या मदतीने सर्च केले, पण देशातील लोकांसाठी अशी कुठलीही खासगी किंवा सरकारी योजने बद्दल ची माहिती आम्हाला मीडिया रिपोर्ट्स मध्ये सापडली नाही. पण, आम्हाला jagranjosh.com ची एक बातमी सापडली ज्यात म्हंटले गेले होते कि वर्ग ८ ते १२ पर्यंत सरकारी शाळेतील मुलांना मोफत टॅबलेट डिवाइस देण्यात येणार आहे. पण हे मिळवण्यासाठी कुठलेच रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे, असे त्यात नमूद केले होते.
आम्हाला अशीच एक बातमी वेस्ट बंगाल ला घेऊन मिळाली. jagranjosh.com च्या बातमी प्रमाणे, “ममता बॅनर्जी च्या पश्चिम बंगाल सरकार ने राज्यात ९.५ लाख पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना टॅबलेट डिवाइस देण्याची योजना बनवत आहे जे पुढच्या वर्षी उच्च माध्यमिक परीक्षांमधे सहभागी होतील.” या बातमी मध्ये देखील कुठल्याच प्रकार च्या रजिस्ट्रेशन बद्दल सांगण्यात आले नव्हते.

विश्वास न्यूज ला प्राप्त झालेल्या ग्राफिक मध्ये कुठल्याच लिंक चा समावेश नव्हता. “रेजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख” या वरून कळतं कि ग्राफिक सोबत एक लिंक देखील पाठवण्यात आली असावी.
आम्ही याबद्दल सायबर सुरक्षा विशेषज्ञ आणि राजस्थान सरकार चे पब्लिक ग्रीविइन्स कमिटी चे पूर्व आयटी सालाहकर आयुष्य भारद्वाज यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि अशी कुठलीच स्कीम नाही. “अश्या प्रकारची लिंक फक्त क्लीकबेट असते. अश्या कुठल्याच लिंक वर क्लीक केल्यावर मोफत टॅबलेट डिवाइस मिळणार नाही.”
भारद्वाज यांनी सांगितले, “इतक्यात सायबर क्राइम वाढले आहे, ज्यात लोकांना कुठल्या लिंक वर क्लीक करून त्यांची माहिती गोळा करण्यात येते किंवा त्यांना ठगण्यात येते. अश्या लिंक वर क्लीक करणे लोकांनी टाळावे.”

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचे समजले. कोणत्या पण लिंक वर क्लीक करण्याच्या आधी त्याचा पूर्ण तपास करावा.

  • Claim Review : मोफत टॅबलेट डिवाइस देण्यात येत आहे.
  • Claimed By : WhatsApp user
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later