X

Fact Check: आलिया भट्ट चा मेहेंदी सेरेमनी चा नाही आहे व्हायरल फोटो, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले, आलिया भट्ट चा व्हायरल फोटो एका ऍड शूटच्या वेळ चा आहे. ज्याला आता आलिया आणि रणबीर च्या लग्न सोबत जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: April 16, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चे नुकतेच लग्न झाले आहे. अश्यातच सोशल मीडिया वर आलिया भट्ट चे एक चित्र व्हायरल होत आहे. चित्रात आलिया भट च्या हातावर मेहेंदी लागलेली दिसते. दावा करण्यात येत आहे कि हे चित्र त्यांच्या मेहेंदी च्या कार्यक्रमाचे आहे.

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले, आलिया भट्ट चा व्हायरल फोटो एका विज्ञापन च्या शूटिंग च्या वेळ चा आहे. ज्याला आता त्यांच्या लग्नाचा असल्याचे सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर India Voice ने व्हायरल चित्र शेअर करून लिहले: “#RanbirKapoorAliaBhattWedding: आलिया का मेहंदी लुक हुआ वायरल।”

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. फेसबुक वर बाकीचे बरेच यूजर्स देखील हे छायाचित्र सारख्या दाव्यासह व्हायरल करत आहे.

तपास:

व्हायरल चित्राच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला. ह्यावेळी आम्हाला व्हायरल चित्रासंबंधित एक रिपोर्ट हिन्दुस्तान टाइम्स च्या वेबसाइट वर 11 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकाशित झाल्याचे सापडले. बातमी प्रमाणे हे चित्र आलिया भट्ट च्या ऍड शूट चे आहे.

आम्ही मिळालेल्या माहिती वर हा व्हिडिओ युट्युब वर शोधण्यास सुरु केला. आम्हाला 3 मार्च 2021 रोजी कॅडबरी पर्क इंडिया च्या चॅनेल वर हि ऍड मिळाली. ऍड मध्ये आलिया भट्ट तशीच दिसते जशी ती व्हायरल चित्रात आहे.

सर्च च्या वेळी आम्हाला व्हायरल चित्र मेहेंदी आर्टिस्ट वीणा नागदा ह्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वर देखील 6 मार्च रोजी हि पोस्ट मिळाली. कॅप्शन प्रमाणे देखील हे चित्र कॅडबरी च्या ऍड शूट च्या वेळ चे आहे. आलिया भट्ट ने देखील हि ऍड आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर 5 मार्च 2021 शेअर केली.

अधिक पुष्टी साठी विश्वास न्यूज ने मुंबई मध्ये दैनिक जागरण ची बॉलीवूड बीट कव्हर करणाऱ्या वरिष्ठ पत्रकार, स्मिता श्रीवास्तव ह्यांना संपर्क केला. त्यांनी देखील आम्हाला आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा खोटा आहे. हे चित्र मागील वर्षीचे ऍड शूट च्या वेळी घेतले गेले होते, ज्याला लोक आता आलिया आणि रणबीर च्या लग्नाचे असल्याचे सांगून शेअर करत आहे. व्हायरल चित्र आलिया भट्ट च्या मेहेन्दीच्या कार्यक्रमाचे नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. यूजर ची सोशल स्कॅनिंग केल्यावर कळले कि हा पेज 13 ऑक्टोबर 2015 पासून सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले, आलिया भट्ट चा व्हायरल फोटो एका ऍड शूटच्या वेळ चा आहे. ज्याला आता आलिया आणि रणबीर च्या लग्न सोबत जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

  • Claim Review : फेसबुक यूजर India Voice ने व्हायरल चित्र शेअर करून लिहले: “#RanbirKapoorAliaBhattWedding: आलिया का मेहंदी लुक हुआ वायरल।”
  • Claimed By : India Voice
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later