X

Fact Check: ग्रीस चे चित्र लखनऊ-आगरा एक्सप्रेस च्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात लखनऊ-आगरा एक्‍सप्रेस-वे च्या नावावर व्हायरल होणारे चित्र हे ग्रीस च्या व्हेरिया शहराचे असल्याचे समजले. काही लोकं हे चित्र युपी चे सांगून व्हायरल करत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: February 10, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक च्या तोंडावर सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे. यूजर्स आपल्या अकॉउंट वर हे चित्र पोस्ट करून दावा करत आहेत कि हे चित्र लखनऊ-आगरा एक्सप्रेस वे चे आहे आणि सोबतच लिहले आहे अखिलेश यादव जिंदाबाद. विश्वास न्यूज ने ह्या चित्राचा तपास केला. त्यात कळले कि हे चित्र लखनऊ-आगरा एक्सप्रेस वे चे नसून ग्रीस चे च्या व्हेरिया शहरातील जुने चित्र आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर नीलम यादव उर्फ नीलू ने 5 फेब्रुवारी रोजी एक चित्र अपलोड करून दावा केला: ‘आओ तुम्हें चांद पे ले जाएँ ……..लखनऊ – आगरा एक्सप्रेस वे की एक खूबसूरत तस्वीर…#अखिलेश_यादव जिंदाबाद जिंदाबाद’
फेसबुक कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. अन्य यूजर देखील हे चित्र युपी चे सांगून व्हायरल करत आहे. सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर हे चित्र व्हायरल होत आहे.

तपास:

विश्‍वास न्‍यूज ने लखनऊ-आगरा एक्सप्रेस-वे च्या नावावर व्हायरल होणाऱ्या चित्राचे सत्य जाण्या साठी आम्ही सगळ्यात आधी ऑनलाइन टूल चा वापर केला. गूगल रिव्हर्स टूल वर व्हायरल चित्र अपलोड केल्यावर सर्च केले, त्यात आम्हाला हे चित्र विविध वेबसाईट वर मिळाले. photographyreel.com वर देखील हे पब्लिश करण्यात आले होते. ह्यात फोटोग्राफर चे नाव आरजिरिस कारामॉउजास असल्याचे सांगितले गेले होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने Argiris Karamouzas चे सोशल मीडिया हॅन्डल तपासले. आम्हाला 21 फेब्रुवारी 2019 रोजी हे चित्र फेसबुक पेज वर सापडले. आम्हाला कळले कि हे चित्र ग्रीस व्हेरिया चे आहे. ह्याला इथे बघा.

हे चित्र शूट्स डिलाइट नावाच्या एका इन्स्ट्राग्राम अकाउंट वर देखील 15 ऑक्टोबर 2021 रोजी अपलोड केलेले मिळाले. ह्यात त्यांनी सांगितले कि argiris-karamouzas ह्यांचे ग्रीस चे चित्र आहे. हे इथे बघा.

विश्वास न्यूज ने पुढील तपासात दैनिक जागरण, आगरा चे डिजिटल हेड प्रतीक गुप्‍ता ह्यांना संपर्क केला. त्यांना व्हायरल चित्र पाठवले. त्यांनी सांगितले कि हे चित्र आगरा-लखनऊ एक्‍सप्रेस-वे चे नाही. हे ग्रीस चे चित्र आहे.

तपासाच्या शेवटी खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि फेसबुक यूजर नीलम यादव उर्फ नीलू एका राजनेतिक दलाच्या आहे. त्यांच्या पेज ला 23 हजार लोकं फॉलो करतात. यूजर युपी ची रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात लखनऊ-आगरा एक्‍सप्रेस-वे च्या नावावर व्हायरल होणारे चित्र हे ग्रीस च्या व्हेरिया शहराचे असल्याचे समजले. काही लोकं हे चित्र युपी चे सांगून व्हायरल करत आहे.

  • Claim Review : यूपी के एक्‍सप्रेस की तस्‍वीर
  • Claimed By : फेसबुक यूजर नीलम यादव उर्फ नीलू
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later