X

Fact Check: या चित्रात पीएम मोदी ‘पठाण’ सिनेमा चा ट्रेलर बघत नाही आहे, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे

टीव्हीवर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर पाहताना पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यालयातून ‘चांद्रयान 2’ चे थेट प्रक्षेपण पाहत होते. टीव्हीचा व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे एडिट करण्यात आला आहे.

  • By Vishvas News
  • Updated: January 20, 2023

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): ‘पठाण’ चित्रपटाबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट टीव्हीवर पाहतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीएम मोदींनी ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये पीएम मोदी टीव्ही पाहताना टाळ्या वाजवताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये ANI आणि HT चा लोगो देखील आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चा तपास केला आणि त्यात कळले कि व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी जुलै 2019 मध्ये टीव्हीवर चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहत होते. पठाण चित्रपटाचा ट्रेलर एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे व्हिडिओ एडिट करून जोडण्यात आला आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Ahmad KD ने 18 जानेवारी रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केले आणि कॅप्शन मध्ये लिहले, “प्रधानमंत्री #नरेंद्रमोदीजी जे ने देखा #पठान फ़िल्म का ट्रेलर साथ ही कहा कि नेता हो या अभिनेता हम सब दिन रात काम करके एक अच्छी चीज बनाते है उस पर इस प्रकार की टिप्पणी करना ठीक नही है।”

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

व्हायरल व्हिडिओमध्ये ANI आणि HT चा लोगो आहे. आम्ही ANI चे ऑफिशिअल सोशल मीडिया हॅन्डल्स तपासायला सुरुवात केली. त्यादरम्यान, एएनआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आम्हाला संपूर्ण व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 22 जुलै 2019 रोजी शेअर करण्यात आला होता. ट्विटनुसार, पंतप्रधान मोदी चांद्रयान-2 लाँच चे थेट प्रक्षेपण पाहत असतानाचा हा व्हिडिओ आहे.

“दूरदर्शन नेशनल” च्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर देखील 22 जुलै 2019 रोजी हा व्हिडिओ शेअर केलेला आम्हाला सापडला, त्यात लिहले होते कि “चांद्रयान-2 लाँच चे थेट प्रक्षेपण पाहताना पंतप्रधान मोदी” यांचा हा व्हिडिओ आहे.

व्हायरल व्हिडिओ 22 जुलै 2019 रोजी हिंदुस्थान लाइव्हच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला सापडला. व्हिडिओसोबतच्या वर्णनात असे लिहिले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-2 च्या लाँच चे थेट प्रक्षेपण पाहिले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 22 जुलै रोजी भारताची दुसरी चंद्र मोहीम सुरू केली. चांद्रयान-२ तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याभरापूर्वी रद्द करण्यात आले होते. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे झाले. चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिणेला व्यापेल.

इतर अनेक वेबसाईट्स ने देखील हि रिपोर्ट प्रसिद्ध केली आहे. मूळ व्हिडिओ आणि बनावट व्हिडिओ मधील फरक खाली बघा.

व्हिडिओबाबत आम्ही दैनिक जागरणच्या नॅशनल ब्युरोच्या रिपोर्टर नीलू रंजन यांच्यासोबत संपर्क केला. हा दावा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओ एडिट केला आहे, असे देखील ते म्हणाले.

विश्वास न्यूजने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे आणि व्हिडिओ एडिट केलेला आहे.

पठाण चित्रपटाबाबत यापूर्वी अनेक बनावट व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यावरील आमचे फॅक्ट चेक रिपोर्ट्स इथे वाचू शकता.

तपासाअंती, आम्ही हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरचे सोशल स्कॅनिंग केले. स्कॅनिंगमध्ये उघड झाले की, यूजर उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. फेसबुकवर युजरचे पाच हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: टीव्हीवर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर पाहताना पंतप्रधान मोदींचा व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. मूळ व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यालयातून ‘चांद्रयान 2’ चे थेट प्रक्षेपण पाहत होते. टीव्हीचा व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे एडिट करण्यात आला आहे.

  • Claim Review : पीएम मोदी 'पठाण' सिनेमा चा ट्रेलर बघत आहे
  • Claimed By : Ahmad KD
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later