X

Fact Check: लोणी खाल्ल्याने डोळ्याचे विकार ठीक होत नाही, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. लोणी जर आहारात संतुलित मात्रेत घेतले तरच चांगले आहे. वैद्यकीय सल्ला घेणे कधीपण चांगले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: September 1, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि लोणी ब्लड सर्क्युलेशन साठी चांगला आहे आणि डोळ्यांची क्षमता वाढवण्यासोबत डोळ्यासंबंधित विकार देखील लोणी मुळे ठीक होतात. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. लोणी जर संतुलित मात्रेत घेतले तर आरोग्यासाठी चांगले असते पण याचे किती प्रमाणात सेवन करावे हे तज्ज्ञांच्या सांगण्यावरूनच ठरवावे.

काय होत आहे व्हायरल?
इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट मध्ये लिहण्यात आले आहे: अगर कोई व्यक्ति मक्खन खाता है, तो उसका रक्त संचार अच्छा रहता है और त्वचा में भी निखार आता है, मक्खन खाने से व्यक्ति की आंखों की रोशनी बढ़ती है और आंखों से संबंधित रोग ठीक हो जाते हैं।

पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आम्ही सगळ्यात आधी लोणी खाल्ल्याने काय फायदे होतात त्याचा तपास सुरु केला. वेबएमडी.कॉम प्रमाणे, लोणी विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि कैल्शियम चा स्रोत आहे. संतुलित मात्रेत घेतल्याने हे उपयोगी पडू शकते.

अमेरिकन ऑप्टोमेट्रिक एसोसिएशन (एओए) प्रमाणे, विटामिन ए डोळ्यांना स्वस्थ ठेवण्यासाठी एक चांगले खाद्यपदार्थ आहे.

अवलोकन संबंधी शोध प्रमाणे स्वस्थ आहार मनुष्यांमधे मोतियाबिंद कमी करण्यास कामात येतो. एका अन्य शोधाप्रमाणे, वयाप्रमाणे संबंधित अध: पतन (AMD) थांबवण्याकरिता विटामिन ए आणि विटामिन ई एक महत्वपूर्ण भूमिका पार पडतात. पण हे सगळ्याच बाबतीत खरे आहे असे नाही.

वयोमानानुसार होणारे त्रास (एएमडी) जसे डोळ्यांचे आजाराचे कारण बहुक्रियाशील असतात आणि त्यात अन्य तथ्य देखील असतात, जसे आनुवंशिक प्रवृत्ति, वय वाढणे, ताण वाढणे इत्यादी.

आम्ही आहार डोळ्यांशी संबंधित रोग बरे करू शकतो की नाही याचा शोध घेतला. डोळ्यांचे आजार बरे करणे किंवा आहाराद्वारे किंवा लोणीचे सेवन केल्याने दृष्टी सुधारणे याबद्दल आम्हाला मर्यादित पुरावे मिळाले.

विश्वास न्यूजने अपोलो स्पेक्ट्रा ग्रुप च्या वरिष्ठ नेत्र सर्जन डॉ कार्तिकेय संगल यांच्यासोबत संवाद साधला आणि व्हायरल पोस्ट त्यांच्यासोबत शेअर केली. ते म्हणाले: “लोणीमध्ये बीटा कॅरोटीन असते, जे व्हिटॅमिन ए चे अग्रदूत आहे. बीटा-कॅरोटीनचा मुख्य फायदा असा आहे की यामुळे वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशन (एएमडी) ची शक्यता कमी होते. याव्यतिरिक्त, हे कॉर्निया आणि रेटिनाच्या आरोग्यास मदत करते. लोणीमध्ये असलेले व्हिटॅमिन ई अतिनील किरणांपासून संरक्षण करते. ऑप्टिक नर्वसाठी व्हिटॅमिन बी 12 चांगले आहे, कारण ते मज्जातंतूचे रक्षण करते. परंतु केवळ लोणीच्या सेवनानेच त्यावर उपचार करता येत नाहीत. त्यासाठी योग्य उपचार आवश्यक आहेत. लोणी, जर कमी प्रमाणात घेतले तर मदत होऊ शकते, परंतु वैद्यकीय सल्ला नेहमी घ्यावा. “

ह्या पोस्ट ला वायरलफैक्टएस नावाच्या यूजर ने इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. आम्ही पेज स्कॅन केला आणि कळले कि या पेज चे 69.3K फॉलोअर्स आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. लोणी जर आहारात संतुलित मात्रेत घेतले तरच चांगले आहे. वैद्यकीय सल्ला घेणे कधीपण चांगले आहे.

  • Claim Review : viral_fact_s
  • Claimed By : गर कोई व्यक्ति मक्खन खाता है, तो उसका रक्त संचार अच्छा रहता है और त्वचा में भी निखार आता है, मक्खन खाने से व्यक्ति की आंखों की रोशनी बढ़ती है और आंखों से संबंधित रोग ठीक हो जाते हैं
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later