X

Fact Check: प्रियांका गांधी यांचे २००९ साल चे छायाचित्र आता बिहार निवडणुकांना जोडून होत आहे व्हायरल

  • By Vishvas News
  • Updated: October 21, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर काँग्रेस च्या नेता प्रियांका गांधी यांचे एक जुने छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे, त्यात दावा केला जात आहे कि आता बिहारच्या निवडणुकांसाठी त्या अलमारीतून साड्या काढत आहेत. या छायाचित्रात प्रियांका गांधी लाल रंगाची साडी नेसून मंदिरात जाताना दिसतात.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केल्यावर असे लक्षात आले कि हि पोस्ट खोटी आहे. २००९ चे अमेठी मधले छायाचित्र आता बिहार निवडणुकांना जोडून व्हायरल केले जात आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राजू सोलंकी यांनी ६ ऑक्टोबर रोजी प्रियांका गांधी चे एक छायाचित्र अपलोड केले आणि त्याबरोबर लिहले:
बिहार_चुनाव आ गया है* तो दादी की #साड़ी अलमारी* से निकल गई है, लेकिन मिलेगा वहीं जो उपर #लटक रहा है.

या फेसबुक पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी प्रियांका गांधी चे हे व्हायरल होत असलेले छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड केले आणि इंटरनेट वर या छायाचित्राचा शोध घेतला. सर्च च्या वेळी आम्ही टाइम लाईन टूल चा पण वापर केला आणि त्यात आम्हाला सगळ्यात जुने छायाचित्र flicker.com या संकेतस्थळावर मिळाले. या छायाचित्राला Pressbrief.in वरून टाकले गेले होते. यात सांगितले होते कि राहुल गांधी यांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी त्या अमेठी येथे गेल्या असताना दुर्गा मंदिरात त्या गेल्या होत्या तेव्हा हे छायाचित्र काढले आहे. हे छायाचित्र १२ एप्रिल २००९ ला घेतले गेले आहे.

व्हायरल छायाचित्र चे सत्य समोर आल्यानंतर आम्ही २००९ साली राहुल गांधी यांचे मीडिया चे काम बघणारे पूर्व सहयोगी पंकज शंकर यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि प्रियांका गांधींचे जुने छायाचित्राचा काही लोकं दुरुपयोग करत आहेत. हे छायाचित्र तेव्हा काढले होते जेव्हा त्या अमेठी च्या दौऱ्या वर आल्या होत्या.

शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर राजू सोलंकी चे प्रोफाइल तपासले, हे अकाउंट जुलै २००९ मध्ये बनवले गेले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात प्रियांका गांधी यांच्या संबंधात असलेली पोस्ट खोटी असल्याचे कळले. २००९ चे हे छायाचित्र आता बिहार निवडणुकांचे सांगून खोट्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे.

  • Claim Review : प्रियांका गांधी चे छायाचित्र बिहार चुनवासोबत संबंधित आहे
  • Claimed By : Raju Solanki
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later