X

Fact Check: सलमान आणि सोनाक्षी चे नाही झाले लग्न, एडिटेड चित्र होत आहे व्हायरल

सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाच्या नावाने व्हायरल होत असलेले फोटो एडिट केले आहेत. बनावट दाव्याने फोटो शेअर केले जात आहेत.

  • By Vishvas News
  • Updated: January 24, 2023

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या फोटोंचा एक कोलाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलाजमध्ये, सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा वधू-वरांच्या वेशभूषेत दिसतात. सलमान खानने सोनाक्षी सिन्हासोबत लग्न केल्याचा दावा करत ही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली जात आहेत.

विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाचे एडिट केलेले व्हायरल फोटो खोटे दावे करून शेअर केले जात आहेत.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज ‘दिशा पाटनी फैन क्लब ‘ ने 20 जानेवारी रोजी चित्रांचा कोलाज शेअर करून दावा केला: ‘दूल्हा-दुल्हन बने सलमान खान और सोनाक्षी सिन्हा, शादी की अनदेखी तस्वीरें हुई वायरल।’

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. सोशल मीडिया वर बाकी यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.

तपास:
सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या व्हायरल फोटोंमागील सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डसह गूगल वर शोधले. शोधादरम्यान, आम्हाला व्हायरल छायाचित्रांशी संबंधित अनेक बातम्या आढळल्या, ज्यामध्ये ही छायाचित्रे बनावट असल्याचे सांगण्यात आले. 5 मार्च 2022 रोजी दैनिक जागरणच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीत सलमान आणि सोनाक्षीचे व्हायरल झालेले फोटो आणि बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात आले.

अजून सर्च दरम्यान, आम्हाला व्हायरल चित्रांवर सोनाक्षी सिन्हाच्या प्रतिक्रियेशी संबंधित अनेक बातम्या देखील सापडल्या. एंटरटेनमेंट वेबसाइट बॉलीवूड टशनने 2 मार्च 2022 रोजी आपल्या इंस्टाग्राम पेजवर ही छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, ‘अफवानुसार, सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांनी एका खाजगी प्रकरणात लग्न केले.’ या पोस्टवर टिप्पणी करताना सोनाक्षी सिन्हाने लिहिले की, ‘तुम्ही इतके मूर्ख आहात का की तुम्ही खऱ्या आणि बनावट चित्रात फरक करू शकत नाही.’

आम्ही सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचे सोशल मीडिया हँडल देखील तपासले, परंतु दाव्याशी संबंधित कोणतीही पोस्ट आम्हाला आढळली नाही.

आम्ही गुगल रिव्हर्स इमेजने कोलाजचा पहिला फोटो शोधला, ज्यामध्ये सलमान खान सोनाक्षी सिन्हाला अंगठी घालताना दिसत आहे. आम्हाला कळले की हा फोटो साऊथ सिनेमाचा अभिनेता आर्या आणि अभिनेत्री सायेशा सहगलच्या रिसेप्शनचा आहे.

कोलाजमधला दुसरा फोटो, ज्यामध्ये सलमान आणि सोनाक्षी हात जोडताना दिसत आहेत, हे खरं तर अभिनेता वरुण आणि नताशाच्या लग्नातील एक चित्र आहे, जे सलमान आणि सोनाक्षीचे चेहरे दाखवण्यासाठी संपादित केले गेले आहे.

अधिक माहितीसाठी विश्वास न्यूजने मुंबईस्थित ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पराग चापेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “व्हायरल झालेली बातमी खोटी आहे आणि ही छायाचित्रे देखील संपादित केली आहेत.

आधी देखील असा दावा व्हायरल झाला होता, त्यावर आम्ही केलेली बातमी तुम्ही इथे वाचू शकता.

तपासाअंती, आम्ही बनावट फोटो शेअर करणाऱ्या फेसबुक पेजचे सोशल स्कॅनिंग केले. स्कॅनिंगमध्ये असे दिसून आले की या पेजला 9,78,085 लोक फॉलो करत आहेत आणि फेसबुकवरील हे पेज 24 डिसेंबर 2016 रोजी तयार करण्यात आले आहे.

निष्कर्ष: सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाच्या नावाने व्हायरल होत असलेले फोटो एडिट केले आहेत. बनावट दाव्याने फोटो शेअर केले जात आहेत.

  • Claim Review : सलमान आणि सोनाक्षी चे लग्न झाले
  • Claimed By : Disha Patani Fan Club
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later