X

Fact Check: सोनिया गांधी यांचे व्हायरल छायाचित्र मॉर्फ्ड आहे

  • By Vishvas News
  • Updated: June 7, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सोनिया गांधी यांचे एक छायाचित्र सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या छायाचित्रात छायाचित्र दिसतात ज्यात एका पुस्तकाचे नाव. “हाउ टू कन्वर्ट इंडिया इंटू ए क्रिश्चिन नेशन” असे असल्याचे दिसते, त्याच्या खाली बायबल नाही येशू ख्रिस्ताचे स्टॅचू देखील ठेवलेले दिसतात. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट मॉर्फ केलेली असल्याचे समजले.

हे छायाचित्र एका व्हिडिओ मधून घेण्यात आले आहे, आणि त्यानंतर एडिटिंग टूल्स च्या मदतीने यात दिसत असलेल्या पुस्तकांचे नाव बदलल्याचे दिसते तसेच या छायाचित्रात बायबल आणि येशू ख्रिस्ताचे स्टॅचू वेगळ्याने या छायाचित्रात ऍड केले आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज हिन्दू राष्ट्र भारत (ग्रुप में जुड़ते ही 50 लोगो को जोड़े) ⛳जय श्री राम⛳ मध्ये हे छायाचित्र शेअर करण्यात आले, त्यासोबत छायाचित्रात लिहले होते: फोटो को बड़ा करके देखो, एक किताब का टाइटल है “हाउ टू कनवर्ट इंडिया इंटू ए क्रिश्चियन नेशन”. भारत को क्रिश्चियन राष्ट्र कैसे बनाया जाए। और सबूतों की जरूरत है क्या?

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्राच्या तपासात सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल ची मदत घेतली. आम्हाला इंडियन नेशनल कांग्रेस च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर एक व्हिडिओ मिळाला. व्हायरल छायाचित्र याच व्हिडिओ वरून घेतले आहे. या व्हिडिओ मध्ये सोनिया गांधी यांच्या मागे, बायबल आणि येशू ख्रिस्ताचा स्टॅचू दिसत नाही आणि निळ्या पुस्तकाचे नाव “हाउ टू कन्वर्ट इंडिया इंटू ए क्रिश्चियन नेशन” असे नाही.

या व्हिडिओ च्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा लोकांना संबोधित केले होते. त्यांनी राज्याची अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी च्या स्तिथी बद्दल संवाद साधला होता. हा व्हिडिओ सगळ्यात आधी ऑक्टोबर २०२० मध्ये राहुल गांधी यांनी शेअर केला होता. त्यानंतर बऱ्याच मीडिया हाऊसेस ने हा स्क्रीनशॉट आपल्या बातमीत वापरला होता.

अधिक माहिती साठी आम्ही काँग्रेस चे प्रवक्ता, पावन खेडा यांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल छायाचित्र मॉर्फ केलेले आहे खऱ्या छायाचित्रात कुठलेच पुस्तक किंवा स्टॅचू नाही. त्यांनी सांगितले कि छायाचित्रावरून त्यांनी एफआयआर देखील दाखल केली आहे.

आम्हाला या संदर्भात यूथ कांग्रेस चे नेशनल प्रेसिडेंट श्रीनिवास बीवी यांचा देखील ट्विट मिळाला, त्यांनी व्हायरल मॉर्फ छायाचित्र शेअर करणाऱ्या हॅन्डल विरोधात एफआयआर दाखल केल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

आता आम्ही फेसबुक वर छायाचित्र शेअर करणारा पेज हिन्दू राष्ट्र भारत (ग्रुप में जुड़ते ही 50 लोगो को जोड़े) ⛳जय श्री राम⛳ या प्रोफाइल चा तपास केला. या प्रोफाइल ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि बातमी होत पर्यंत या पेज चे 67800 पेक्षा जास्ती सदस्य होते.;

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हे स्पष्ट झाले कि सोनिया गांधी चे व्हायरल छायाचित्र मॉर्फ केलेले आहे. खऱ्या व्हिडिओ मध्ये सोनिया गांधी यांच्या मागे कुठलेच पुस्तक किंवा स्टॅच्यू दिसत नाही.

  • Claim Review : सोनिया गांधी यांचे व्हायरल छायाचित्र
  • Claimed By : FB Page:हिन्दू राष्ट्र भारत (ग्रुप में जुड़ते ही 50 लोगो को जोड़े) ⛳जय श्री राम
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later