X

Fact Check: ब्राझील मध्ये नाही मिळाला जिवंत डायनोसॉर, व्हायरल व्हिडिओ मध्ये खरा ट्राइसेराटॉप्स नाही आहे

विश्वास न्यूज च्या तपासा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. आम्हाला कळले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेला जनावर हि मोजोसमी फॉरेस्ट पार्क मधल्या डायनासोर ची प्रतिकृति आहे, ज्याला माणसं संचालित करतात. हा डायनोसॉर खरा नाही.

  • By Vishvas News
  • Updated: January 4, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही लोकं एका डायनोसॉर सारख्या दिसणाऱ्या जनावराला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. व्हिडिओ मध्ये दावा करण्यात येत आहे कि हा डायनोसॉर ब्राझील च्या जंगलात मिळाला.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. आम्हाला कळले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेला जनावर हा इंडोनेशिया च्या मोजोसमी फॉरेस्ट पार्क मध्ये असलेल्या डायनोसॉर ची प्रतिकृती आहे.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल पोस्ट मध्ये डायनोसॉर सारखा दिसणारा जनावर नियंत्रित करताना लोकं दिसतात. पोस्ट सोबत लिहले आहे, “ब्रेकिंग: ब्राझील च्या अधिकाऱ्यांना एक जिवंत ट्राइसेराटॉप्स पकडला, जो त्यांना वर्षावन तोडताना सापडला.
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
पोस्ट चा तपास आम्ही व्हायरल व्हिडिओ ला InVID टूल मध्ये अपलोड करून सुरु केला, त्यातून आम्हाला स्क्रीनग्रेब्स मिळाले ज्यांना आम्ही गूगल रिव्हर्स इमेज वर टाकून शोधले. आम्हाला हा व्हिडिओ मोजोसेमी फॉरेस्ट पार्क नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर मिळाला. मोजोसमी फॉरेस्ट पार्क इंडोनेशिया एक एम्यूज़मेंट पार्क आहे.

आम्ही खात्री करून घेण्यासाठी मोजोसेमी फॉरेस्ट पार्क चे एडमिन इंचार्ज नानंग सेडायु (Nanang Sedayu) यांच्या सोबत फोन वर संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा खरा डायनोसॉर नाही आहे. हा एक माणसांद्वारे संचलित केला जाणारा रेप्लिका आहे. हा एक सूट आहे ज्याला २-३ लोकं घालून फिरतात. ह्याला नव्या राईड च्या प्रोमोशन साठी बनवण्यात आले आहे.

या पोस्ट ला शेअर करणाऱ्या ट्विटर हॅन्डल ला ४,५४८ लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. आम्हाला कळले कि व्हिडिओ मध्ये दिसत असलेला जनावर हि मोजोसमी फॉरेस्ट पार्क मधल्या डायनासोर ची प्रतिकृति आहे, ज्याला माणसं संचालित करतात. हा डायनोसॉर खरा नाही.

  • Claim Review : ब्रेकिंग: ब्राझील च्या अधिकाऱ्यांना एक जिवंत ट्राइसेराटॉप्स पकडला, जो त्यांना वर्षावन तोडताना सापडला.
  • Claimed By : Dr Humptapuss, ED
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later