X

Fact Check: नेशनल जियोग्राफिक ने आकाशगंगा अर्थात मिल्की वे वर ट्विट नाही केले, व्हायरल ट्विट अल्टर करून बनवले आहे

  • By Vishvas News
  • Updated: June 10, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक ट्विट चा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे, यात असे दाखवले गेले आहे कि नेशनल जियोग्राफिक चॅनेल ने आकाशगंगा (मिल्की वे) बद्दल ट्विट केले आहे. या कथित ट्विट मध्ये लिहले आहे, “Bright, white and associated to milk, a white substance. Is the way our own galaxy is named, racist?” विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. नेशनल जियोग्राफिक ने मिल्की वे बद्दल ट्विट केले नाही. हि पोस्ट दुसऱ्या असंबंधित पोस्ट सोबत अल्टर करून बनवली गेली आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Jacob Arthur ने पोस्ट शेअर करून लिहले: Even the galaxy is racist now…🙄
या पोस्ट च्या माध्यमातून असे दाखवण्यात येत आहे कि हे ट्विट नेशनल जियोग्राफिक कडून करण्यात आले आहे. या स्क्रीनशॉट मध्ये लिहले आहे: “Bright, white and associated to milk, a white substance. Is the way our own galaxy is named, racist?”

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने नेशनल जियोग्राफिक च्या ट्विटर अकाउंट @NatGeo ला InVID टूल च्या ट्विटर ऍडव्हान्स सर्च ऑप्शन वापरून केला, पण आम्हाला त्या हॅन्डल वर असा कुठलाच ट्विट मिळाला नाही जो व्हायरल पोस्ट मध्ये आहे. आम्ही महत्वाचे कीवर्डस वापरून गूगल वर सर्च देखील केले.
आम्हाला असे करताना नेशनल जियोग्राफिक चा १२ जानेवारी २०१२ रोजी पब्लिश केलेला एक ब्लॉग मिळाला, ज्याचा कॅप्शन होता, आपली आकाशगंगा दुधासारखी शुभ्र आहे. हा ब्लॉग इथे क्लिक करून वाचा.

जसे व्हायरल ट्विट मध्ये सांगितले गेले आहे, तसे काहीच या ब्लॉग मध्ये लिहलेले नाही. आम्हाला नेशनल जियोग्राफिक चा २८ मे २०२१ रोजी केलेला एक ट्विट देखील मिळाला ज्यात व्हायरल छायाचित्र अपलोड केलेले होते. नेशनल जियोग्राफिक ने ह्या ट्विट मध्ये सांगितले कि M81 गैलेक्सी मधून रेडियो वेव्स मिळाले आहेत. या बद्दल नेशनल जियोग्राफिक ची रिपोर्ट इथे क्लिक करून वाचा.

विश्वास न्यूज ने यासंबंधात सरळ नेशनल जियोग्राफिक लाच संपर्क केला. इमेल द्वारे त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल पोस्ट एडिटेड आहे. नेशनल जियोग्राफिक चे नाव चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येत आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा असल्याचा कळले. नेशनल जियोग्राफिक ने आकाशगंगे वर कुठलेच व्हायरल ट्विट केले नाही. व्हायरल स्क्रीनशॉट एडिट केलेला आहे आणि असंबंधित ट्विट वापरून तयार केला आहे.

  • Claim Review : Even the galaxy is racist now
  • Claimed By : Jacob Arthur
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later