X

Fact Check: दिलजीत दोसांझने हे वक्तव्य केले नाही, त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्विट खोटे आहे

दिलजीत दोसांझ ह्यांचे शेतकरी आंदोलनावरचे ट्विट त्यांनी केलेले नाही. व्हायरल ट्विट खोटे आहे.

  • By Vishvas News
  • Updated: January 13, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पंजाबी गायक आणि बॉलीवूड अभिनेते दिलजीत दोसांझच्या नावाने एका ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, “काश किसानों की तरह अगर पढ़े-लिखे लोग भी सड़कों पर आ जाते तो न एयरपोर्ट बिकता, न रेलवे स्टेशन, न नौकरी जाती, न जीडीपी गिरती।” हे ट्विट दिलजीत दोसांझने केल्याचा दावा करण्यात येत आहे. विश्‍वास न्यूजला तपासात आढळून आले की व्हायरल होत असलेले ट्विट दिलजीतने केले नाही.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
फेसबुक वापरकर्ता गुरचरण सिंग यांनी ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यात असे लिहिले आहे: “काश किसानों की तरह पढ़े-लिखे लोग भी सड़कों पर आ जाते, न एयरपोर्ट बिकता, न रेलवे स्टेशन, न LIC, BPCL बिकती, न नौकरी जाती, न बेरोजगारी बढ़ती, न जीडीपी गिरती!”

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
तपास सुरू करताना, विश्वास न्यूजने सर्वप्रथम @Diljitdosanjhi या व्हायरल पोस्टमध्ये दिसणारे ट्विटर हँडलचा शोध घेतला. आम्हाला आढळले की हे हँडल अस्तित्वात नाही. वे-बॅक मशीनवर शोधताना, आम्हाला या पृष्ठाचे 7 आणि 8 डिसेंबर 2020 चे 2 स्क्रीनशॉट सापडले. पण इथे ब्लू टिक नव्हती. म्हणजेच या खात्याची पडताळणी झालेली नाही. तसेच, ट्विटर हँडलवर दिलजीतच्या नावाच्या शेवटी एक्स्ट्रा आय (i) टाकण्यात आले आहे. दिलजीतचे मूळ ट्विटर हँडल त्यांच्या नावावर आहे पण शेवटी (i) नाही.

यानंतर आम्ही दिलजीतचे मूळ ट्विटर हँडल शोधले. त्यांच्या ट्विटर हँडलवर आम्ही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ट्विट पाहिले, परंतु व्हायरल ट्विट किंवा तत्सम कोणतेही ट्विट आम्हाला आढळले नाही.

अधिक तपशिलांसाठी आम्ही पंजाबी जागरणसाठी मनोरंजन बीट कव्हर करणाऱ्या पत्रकार तेजिंदर कौर यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल होत असलेले ट्विट दिलजीत दोसांझने केले नसून त्याच्या नावाने बनवलेल्या बनावट अकाऊंटने केले असल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुकवर व्हायरल झालेली पोस्ट गुरचरण सिंग नावाच्या युजरने शेअर केली आहे. या वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केल्यानंतर आम्हाला आढळले की वापरकर्त्याचे 4,114 फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: दिलजीत दोसांझ ह्यांचे शेतकरी आंदोलनावरचे ट्विट त्यांनी केलेले नाही. व्हायरल ट्विट खोटे आहे.

  • Claim Review : काश किसानों की तरह पढ़े-लिखे लोग भी सड़कों पर आ जाते, न एयरपोर्ट बिकता, न रेलवे स्टेशन, न LIC, BPCL बिकती, न नौकरी जाती, न बेरोजगारी बढ़ती, न जीडीपी गिरती!: दिलजीत दोसांझ
  • Claimed By : ट्विटर पर दिल छू‌ लेने वाला टवीट
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later