X

Fact Check: मोठ्या चंद्राचा व्हिडिओ खरा नाही, एडिटिंग च्या मदतीने बनवण्यात आला आहे

व्हायरल दावा ज्यात सांगण्यात आले कि चंद्राचा हा व्हिडिओ कॅनडा, अलास्का आणि रुस च्या सीमेवर आर्क्टिक सर्कल मध्ये घेण्यात आला आहे, तो दावा खोटा ठरला. व्हायरल व्हिडिओ डिजिटल रित्या Aleksey Patrev ह्यांनी बनवला आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 11, 2022

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ हिंदी आणि मराठी मध्ये व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. हा व्हिडिओ व्हाट्सअँप आणि फेसबुक वर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून दावा करण्यात येत होता कि हा व्हिडिओ खरा असून आर्क्टिक सर्कल मध्ये घेण्यात आला आहे. विश्वास न्यूज ने आधी देखील ह्या दाव्याचा तपास केला होता. हा दावा खोटा असल्याचे आमच्या लक्षात आले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Thakur RajeshSingh Parmar ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून हिंदी मध्ये लिहले:

जय जय ♥️
यह वीडियो कनाडा, अलास्का और रूस की सीमा के बीच आर्कटिक सर्कल के अंदर शूट किया गया है। यह केवल कुछ सेकंड तक रहता है, लेकिन यह शानदार दृश्य को निहारने लायक है। यह घटना वर्ष में केवल एक बार 36 सेकंड के लिए देखी जा सकती है; चंद्रमा अपने सभी वैभव में प्रकट होता है और फिर गायब हो जाता है। यह इतना करीब है कि ऐसा लगता है कि यह पृथ्वी से टकराने वाला है, इसके तुरंत बाद 5 सेकंड के लिए पूर्ण सूर्य ग्रहण होता है जहां सब कुछ अंधेरा हो जाता है। यह घटना केवल पेरिगी (वह बिंदु जहां चंद्रमा पृथ्वी के सबसे निकट है) पर होती है और यहीं से हम उस महान गति का एहसास कर सकते हैं जिस पर हमारा ग्रह चलता है। अद्भुत

भाषांतर: कॅनडा, अलास्का आणि रशियाच्या सीमेदरम्यान आर्क्टिक सर्कलमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हे फक्त काही सेकंद टिकते, परंतु नेत्रदीपक दृश्याचे कौतुक करणे योग्य आहे. ही घटना केवळ वर्षातून एकदाच 36 सेकंदांसाठी पाहिली जाऊ शकते; चंद्र त्याच्या सर्व वैभवात दिसतो आणि नंतर अदृश्य होतो. ते इतके जवळ आहे की ते पृथ्वीशी आदळणार आहे असे दिसते, त्यानंतर लगेचच 5 सेकंदांसाठी संपूर्ण सूर्यग्रहण होते जेथे सर्व काही अंधारून जाते. ही घटना केवळ पेरीजी येथे घडते (ज्या ठिकाणी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे) आणि तेथूनच आपला ग्रह किती वेगाने फिरतो हे आपण जाणू शकतो. अप्रतिम व अद्भुत !!!

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने आधी हा व्हिडिओ दोऊनलोड करून, इन्व्हिड टूल च्या मदतीने स्क्रीनग्रेब्स घेतले. हा व्हिडिओ आम्ही रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधला.

आम्हाला हा व्हिडिओ एका युट्युब चॅनेल Aleksey_n वर अपलोड केल्याचे लक्षात आले.

ह्या व्हिडिओ चे जो युट्युब शॉर्ट मधी अपलोड करण्यात आला होता त्याचे शीर्षक होते: Supermoon

अबाऊट अस सेक्शन मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे आम्हाला Aleksey Patrev असे यूजर चे पूर्ण नाव असल्याचे समजले.

आम्हाला त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट देखील सापडले, त्या प्रमाणे, Aleksey हे एक डिजिटल क्रिएटर आहेत.

आम्हाला व्हायरल रील ‘seekersofthecosmos‘ नावाच्या इंस्टाग्राम हॅन्डल वर सापडले ज्यात Aleksey ने हे अनिमेशन केले असे सांगण्यात आले होते.

आधी तपास करताना विश्वास न्यूज ने Aleksey Patrev ह्यांना इमेल द्वारे संपर्क केला होता आणि त्यांनी सांगितले होते कि कॉम्पुटर ग्राफिक वापरून त्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही अॅनिमेटर आणि डिजिटल एडिटर सारंग निमखेडकर ह्यांना संपर्क केला, त्यांनी सांगितले कि कॉम्पुटर जनरेटेड इमेजरी (CGI) वापरून ह्या व्हिडिओ चा निर्माण करण्यात आला आहे. ह्यात चंद्राची प्रतिमा एका दुसऱ्या दृश्यावर वापरण्यात आली आहे.

विश्वास न्यूज ने आधी देखील ह्याच व्हिडिओ चा तपास केला होता. ते फॅक्ट चेक खाली बघा.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि Thakur RajeshSingh Parmar हे इंदोर चे रहिवासी आणि डिसेंबर २०१६ पासून फेसबुक वर आहे.

निष्कर्ष: व्हायरल दावा ज्यात सांगण्यात आले कि चंद्राचा हा व्हिडिओ कॅनडा, अलास्का आणि रुस च्या सीमेवर आर्क्टिक सर्कल मध्ये घेण्यात आला आहे, तो दावा खोटा ठरला. व्हायरल व्हिडिओ डिजिटल रित्या Aleksey Patrev ह्यांनी बनवला आहे.

  • Claim Review : कॅनडा, अलास्का आणि रशियाच्या सीमेदरम्यान आर्क्टिक सर्कलमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे
  • Claimed By : Thakur RajeshSingh Parmar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later