X

Fact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा

व्हायरल व्हिडिओ ज्यात दावा केला जात आहे कि व्हॅक्सिन च्या विरोधात बोलत असलेले डॉक्टर हे नायर हॉस्पिटल चे डीन आहे, हा दावा खोटा आहे. डॉ तरुण कोठारी हे दिल्ली चे असून तिथे त्यांचे स्वतःचे क्लिनिक आहे.

  • By Vishvas News
  • Updated: July 29, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसले. या व्हिडिओ मध्ये सांगण्यात येत होते कि एक डॉक्टर, ज्याचे नाव तरुण कोठारी आहे आणि मुंबई च्या नायर हॉस्पिटल चे डीन आहे, ते लोकांना मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि व्हॅक्सिन न घेण्यास सांगत आहेत.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करत असल्याचे समजले. हा व्हिडिओ खोट्या डाव्या सह शेअर करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Asli Pathan यांनी व्हायरल व्हिडिओ Mumbra नावाच्या ग्रुप वर शेअर केला आणि लिहले:  Dr. Tarun kothari Din of Nayar Hospital mumbai ( M. B. B. S / M. D.) Sp. MRD TB

१:३४ मिनिटाच्या ह्या व्हिडिओ मध्ये एक माणूस रस्त्याच्या मधोमध गर्दी मध्ये उभा राहून लोकांना संबोधित करत असल्याचे दिसते. यात ते लोकांना सांगत आहेत कि कोणीही येऊन म्हंटले तरी मास्क लावायचा नाही, सोशल डिस्टन्स चे पालन करायचे नाही आणि व्हॅक्सिन पण घयायची नाही.

हि पोस्ट आणि याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ आणि त्याचा कॅप्शन निरखून बघितले. त्यात बऱ्याच व्याकरण आणि स्पेलिंग च्या त्रुट्या होत्या. डीन चे स्पेलिंग, ‘Din’ असे लिहले होते, जेव्हाकी ते ‘Dean’ असे आहे. त्यानंतर नायर होपीटल चे स्पेलिंग देखील ‘Nayar’ असे लिहण्यात आले होते, जेव्हाकी ते ‘Nair’ असे आहे.

विश्वास न्यूज ने त्यानंतर एक साधा गूगल सर्च केला. आम्ही  ‘Dr Tarun Kothari’, ‘Anti-vaccine’ असे कीवर्डस वापरून सर्च करण्यास सुरुवात केली. यावरून आम्हाला त्यांचा ट्विटर प्रोफाइल मिळाला.

त्यांनी त्यांच्या बायो मध्ये लिहले होते: Dr. Tarun Kothari
MBBS, MD, Educator, Fighter,
Activist, Motivational Sp., Author
1. Corona Pandemic Scandal
2. कोरोना महामारी महा षड़यंत्र
3. CURE DIABETES

या संपूर्ण बायो मध्ये कुठेच दिले नव्हते कि ते कुठल्या हॉस्पिटलचे डीन आहे. त्यांच्या ट्विटर च्या लोकेशन टॅग वर देखील नवी दिल्ली असे लिहून आले होते.

पण आम्हाला त्यांच्या प्रोफाईल वर एक लिंक दिसली, जी एका वेबसाईट ची होती ज्यात त्यांनी हि महामारी एक स्कँडल असल्याचे सांगितले होते.

आम्ही त्यानंतर काही मीडिया रिपोर्ट्स शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला हे दिसत होते कि ते सारखा कोरोनाव्हायरस च्या विरोधात बोलत होते, याचा अर्थ कुठेतरी त्यांच्याबद्दल बातमी प्रकाशित झाली असलेच. आम्हाला नवभारत टाइम्स ची एक रिपोर्ट सापडली.

या बातमी प्रमाणे, डॉ तरुण कोठारी यांच्या विरोधात एफआयआर रजिस्टर करण्यात आली होती, त्यांनी म्हंटले होते, “तुम्ही मास्क लावलात तर प्राण गमवावे लागतील”
हि बातमी नवी दिल्ली वरून प्रकाशित केली गेली होती. रिपोर्ट मध्ये लिहले आहे कि एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर दिल्ली पोलीस च्या क्राईम ब्रांच ने त्यांच्या विरोधात एफआयआर रजिस्टर केली आणि डॉ तरुण कोठारी यांच्यावर तपास सुरु केला. न्यूज मध्ये सांगण्यात आले आहे कि कोठारी हे पश्चिम विहार चे निवासी आहेत आणि त्यांनी एमबीबीएस आणि एमडी (रेडिओलॉजि) उदयपूर च्या कॉलेज मधून केली आहे. त्यांचा विश्व शक्ती पार्टी म्हणून एक राजकीय पक्ष देखील आहे. त्याचे ते अध्यक्ष आहे. त्यांचे बरेच वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहे.

आम्हाला गूगल वर त्यांच्या क्लिनिक चा नंबर देखील मिळाला. क्लिनिक मधल्या स्टाफ ने विश्वास न्यूज सोबत बोलताना सांगितले, “डॉ तरुण कोठारी हे रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांचे  ‘इंडो अमेरीकन हेल्थ केअर’ नावाचे  स्वतःचे क्लिनिक आहे, जे पीरागरही, दिल्ली मध्ये आहे.

विश्वास न्यूज ने नायर हॉस्पिटल, मुंबई यांना देखील संपर्क केला. तिथल्या असिस्टंट मेडिकल ऑफिसर नि आम्हाला सांगितले कि, डॉ रमेश भारमल हे नायर हॉस्पिटल चे डीन आणि डायरेक्टर आहे, डॉ तरुण कोठारी नाही.”

फेसबुक यूजर Asli Pathan यांचा सोशल बॅकग्राऊंड चेक केल्यावर कळले कि ते ठाणे, मुंबई, महाराष्ट्राचे रहिवासी आहेत.


निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यात दावा केला जात आहे कि व्हॅक्सिन च्या विरोधात बोलत असलेले डॉक्टर हे नायर हॉस्पिटल चे डीन आहे, हा दावा खोटा आहे. डॉ तरुण कोठारी हे दिल्ली चे असून तिथे त्यांचे स्वतःचे क्लिनिक आहे.

  • Claim Review : डॉ तरुण कोठारी हे मुंबईच्या नायर हॉस्पिटल चे डीन आहे.
  • Claimed By : Asli Pathan
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later