X

Fact Check: असे अधिकतर मुलांचा एक्सरे नसतो, हा हाइपरडोंटिया चा केस आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे. हा एक्सरे हाइपरडोंटिया पीडित एका मुलीचा आहे. अश्यात हे म्हणणे कि जास्तीत जास्त मुलांचा एक्सरे असाच असतो, चुकीचे ठरेल.

  • By Vishvas News
  • Updated: August 11, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एका एक्सरे चे छायाचित्र व्हायरल होत आहे. यात एक स्कल आणि त्याचे दात दिसत आहेत. यूजर्स व्हायरल पोस्ट मधल्या एक्सरे द्वारे दावा करत आहेत कि व्हायरल छायाचित्र एका लहान मुलाचा एक्सरे आहे आणि तो एक्सरे भयभीत करून देणारा असतो. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी ठरली. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हे चित्र खरे आहे पण असे म्हणणे बरोबर नाही के हे अधिकतर मुलांचे आहे, व्हायरल चित्रात वापरलेले छायाचित्र हाइपरडोंटिया केस सोबत संबंधित आहे.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया वर एका कवटीचे एक्सरे व्हायरल करून लिहण्यात आले आहे: “Toddler skull X-rays are terrifying.”

या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास करण्यासाठी सगळ्यात आधी ऑनलाईन टूल ची मदत घेतली. गूगल रिव्हर्स इमेज टूल च्या माध्यमाने आम्हला कळले कि ह्या चित्राचा वापर एका रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. अमेरिकन जर्नल ऑफ ऑर्थोडॉन्टिक्स एंड डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्स च्या ऑक्टोबर 2011 च्या स्टडी मध्ये आम्हाला हे छायाचित्र मिळाले. ‘मल्‍टीपल हाइपरडोंटिया : रिपोर्ट ऑफ एन अनयूजुअल केस’ नावाच्या या रिपोर्ट मध्ये याबद्दल सांगण्यात आले होते. यात अंगितले होते की 11 वर्षे 8 महिन्याच्या एका मुली मध्ये ३१ जास्तीचे दात सापडले. हा मल्‍टीपल हाइपरडोंटिया असा केस होता. जो सामान्यतः कुठेच मिळत नाही. हि पूर्ण रिपोर्ट इथे वाचा.

काय आहे हाइपरडोंटिया?
जेव्हा तोंडात एक सोबत खूप सारे दात येतात, तेव्हा त्या स्तिथी ला हाइपरडोंटिया असे म्हणतात. जबड्यात असलेल्या अतिरिक्त दातांना, supernumerary teeth असे म्हंटले जाते. हे जबड्यात कुठे पण मिळू शकतात. या एरिया ला dental arches म्हणतात.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने मुंबई च्या MDS, Prosthodontics डॉक्टर सागर जे. अबिचंदानी यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि जेव्हा दुधाचे दात आणि स्थायी दात जबड्यात एक सोबत मिसळून जातात, तेव्हा अशी स्तिथी बनते, पण हे सगळ्या मुलांना होईल असे शक्य नाही.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही दिशाभूल पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि यूजर चे नाव Heather-Michelle Keinath आहे, यूजर मिशीगन चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे. हा एक्सरे हाइपरडोंटिया पीडित एका मुलीचा आहे. अश्यात हे म्हणणे कि जास्तीत जास्त मुलांचा एक्सरे असाच असतो, चुकीचे ठरेल.

  • Claim Review : Skull of most of the kids
  • Claimed By : Heather-Michelle Keinath
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later