X

Fact Check: अरविंद केजरीवाल चे चित्र असलेले हे बोर्ड एडिटेड आहे

विश्वास न्यूज च्या तपासात कीर्तिनगर मध्ये दहा डस्टबिन लावल्याचा बोर्ड एडिटेड असल्याचे समोर आले. या बद्दल स्वतः आम आदमी पार्टी ने पुष्टी केली आहे.

  • By Vishvas News
  • Updated: August 4, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे चित्र असलेले एक बोर्ड व्हायरल होताना दिसत आहे. यात दावा करण्यात येत आहे कि कीर्तिनगर इंडस्ट्रीयल एरिया मध्ये दहा डस्टबिन लावल्यावर मुख्यमंत्र्यांनी हे बोर्ड लावले आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला आणि त्यात कळले कि कि हा बोर्ड एडिट करून मग व्हायरल केला जात आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी सिद्ध झाली.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर पोस्‍ट ऑफिस ने 2 ऑगस्ट 2021 रोजी एक चित्र अपलोड केले आणि लिहले: पोस्टर में तो दस डस्टविन का जिक्र है फिर एक ही डस्टविन का फोटू क्यों लगा है

पोस्ट मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या चित्राचा वापर करण्यात आला आहे आणि लिहले आहे: बधाई हो दिल्‍ली, कीर्तिनगर इंडस्ट्रियल एरिया में दस नए डस्‍टबिन की व्‍यवस्‍था।

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल होत असलेल्या बोर्ड चा तपास केला. याला बघता क्षणीच समजले कि हे व्हायरल चित्र एडिटेड आहे. खाली दिसत असलेले चित्र नीट बघितल्यास आम्हाला कळले कि हे वेगळ्याने जोडले आहे. विश्वास न्यूज द्वारे एडिटेड भाग आम्ही समजावण्याचा प्रयास केला आहे. केजरीवाल च्या चित्राच्या बाजूला असलेली रिकामी जागा हे सांगते कि चित्र एडिटेड आहे. या शिवाय वरचा भाग देखील एडिट केला आहे.

विश्वास न्यूज च्या तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही आम आदमी पार्टी चे मीडिया को-ऑर्डिनेटर विकास योगी यांना संपर्क केला आणि त्यांच्या सोबत हे छायाचित्र शेअर केले. त्यांनी याला बघून सांगितले कि हे चित्र एडिटेड आहे. बोर्ड बघितल्यावरच असे कळते कि यांच्या चित्रासोबत खोड तोड करण्यात आली आहे. जर का मुख्यमंत्री आणि त्यांचे चित्र नीट बघितले तर तसे लक्षात येईल.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही फेसबुक पेज पोस्ट ऑफीस चा तपास केला. त्यात कळले कि त्यांचे दहा हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत आणि हा पेज 7 मे 2019 रोजी बनवले गेले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कीर्तिनगर मध्ये दहा डस्टबिन लावल्याचा बोर्ड एडिटेड असल्याचे समोर आले. या बद्दल स्वतः आम आदमी पार्टी ने पुष्टी केली आहे.

  • Claim Review : पोस्टर में तो दस डस्टविन का जिक्र है फिर एक ही डस्टविन का फोटू क्यों लगा है
  • Claimed By : पोस्ट ऑफिस
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later