X

Fact Check: फेसबुक फाउंडर मार्क झकरबर्ग सोबत इस्राएल चे पंतप्रधान नेतन्याहू यांचे छायाचित्र एडिटेड आहे

  • By Vishvas News
  • Updated: May 27, 2021

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): पॅलेस्टाईन आणि इस्राएल यांच्या मध्ये हिंसेचे वातावरण असताना सोशल मीडिया वर बरेच दावे व्हायरल होत होते. असच्याच एका घटनेत सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात इस्रायली सेनेचा गणवेश घालून मार्क झकरबर्ग बसलेले दिसतात आणि त्यांच्या सोबत इस्राएल चे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. हे छायाचित्र शेअर करून बरेच यूजर दावा करत आहेत कि फेसबुक फाउंडेर इस्राएल ला साथ देत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले आणि तसेच हे छायाचित्र मॉर्फ्ड असल्याचे देखील समोर आले. खऱ्या छायाचित्रात नेतन्याहू यांच्यासोबत इस्राएल चे सेनाध्यक्ष लेफ्टिनेंट जनरल अवीव कोहावी आहेत. खरे छायाचित्र २०१९ चे आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sanjeev Sisodiya ने २० मे २०२१ रोजी व्हायरल छायाचित्र शेअर करून लिहले: ‘आतंकी संगठन हमास समर्थक ईमान वाले बायकॉटियों इजरायल के विरोध में फेसबुक कब छोड़ रहे हो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣’

ह्या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधून केले. आम्हाला हे छायाचित्र timesofisrael.com या वेबसाईट वर मिळाले. पण या छायाचित्रात नेतन्याहू यांच्या सोबत मार्क झकरबर्ग नव्हते, पण दुसरेच कोणी होती. छायाचित्रासोबत डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: “Prime Minister Benjamin Netanyahu and IDF Chief of Staff Aviv Kohavi at a press conference after a security cabinet meeting following the escalation of violence in the Gaza Strip, at IDF headquarters in Tel Aviv, on November 12, 2019”

कीवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला २०१९ मध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरेन्स चे अनेक छायाचित्र गेट्टी इमेजस वर मिळाले. या सगळ्या छायाचित्रांच्या डिस्क्रिप्शन प्रमाणे, छायाचित्रात इस्राएलच्या पंतप्रधानांसोबत आईडीएफ चीफ ऑफ स्टाफ अवीव कोहावी आहेत.

या विषयी आम्ही जेट्टी इमेजस वर छायाचित्र काढणारे फोटोजर्नलिस्ट गिल कोहेन-मैगन यांना ट्विटर वरून संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि ते त्या प्रेस कॉन्फेरंस ला होते आणि त्यांनि बरेच छायाचित्र काढले. पण व्हायरल छायाचित्र त्यांनी काढले नाही असे देखील त्यांनी सांगितले. पण हे स्पष्ट केले कि व्हायरल छायाचित्र २०१९ मध्ये तेल अवीव मध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरेन्स चे आहे. त्यांनी सांगितले, “व्हायरल छायाचित्र एडिटेड आहे आणि खऱ्या छायाचित्रात इस्राएल चे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत इस्राएल चे सेनाध्यक्ष अवीव कोहावी आहेत.”

फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणारे पेज, “पप्पू के राजनीतिक व्यंग्य” हे प्रोफाइल विश्वास न्यूज ने स्कॅन केले. प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि त्यांच्या पेज चे 85.9K फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. व्हायरल छायाचित्र मॉर्फ्ड आहे. खऱ्या छायाचित्रात इस्राएल चे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत तिथले सेनाध्यक्ष, लेफ्टिनेंट जनरल अवीव कोहावी होते. फेसबुक फाउंडर मार्क झकरबर्ग या छायाचित्रात नाही. खरे छायाचित्र २०१९ चे आहे.

  • Claim Review : फेसबुक फाउंडर मार्क झकरबर्ग सोबत इस्राएल चे पंतप्रधान नेतन्याहू
  • Claimed By : Sanjeev Sisodiya
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later