X

Fact Check: कोल्ह्यासारखे दिसणारे हे पहाड अस्तित्वात नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे

एडिटिंग सॉफ्टवेयर च्या मदतीने बनवले गेलेले छायाचित्र यात दिसत असलेल्या पहाडाच्या आकार कोल्ह्यासारखा नाही. व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.

  • By Vishvas News
  • Updated: April 2, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर बर्फाने झाकलेल्या पहाडांच्यामध्ये, कोल्ह्याच्या चेहऱ्याच्या आकाराच्या एका पहाडाचे छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे. दावा करण्यात येत आहे कि हे, नॉर्वे चे वूल्फ माउंटन आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला आणि हा दावा खोटा असल्याचे समजले. हे छायाचित्र एडिटिंग सॉफ्टवेयर च्या मदतीने बनवले गेले आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Ronnie Bottomley ने हे छायाचित्र व्हायरल करत कॅप्शन लिहले: वुल्फ माउंटेन, नॉर्वे
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्राला गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधून केली. आम्हाला हे छायाचित्र एका ट्विट मध्ये मिळाले.
ट्विटर यूजर dominic dyer ने हे छायाचित्र पोस्ट करून क्रेडिट Michelle von Kalben यांना दिले होते. या नंतर आम्ही इंटरनेट वर Michelle von Kalben यांच्याबद्दल सर्च केले. या सर्च मध्ये आम्हाला मिशेल यांचे इंस्टाग्राम अकाउंट मिळाले. मिशेल च्या इन्स्टा प्रोफाइल प्रमाणे, त्या एक डिजिटल आर्टिस्ट आहेत. त्यांच्या हॅन्डल वर आम्हाला व्हायरल फोटो पण मिळाले, जे त्यांनी १३ मार्च २०२१ रोजी पोस्ट केले होते. कॅप्शन मध्ये त्यांनी लिहले, कि जेव्हा त्यांनी हि पहाडी नॉर्वे मध्ये बघितली तेव्हा त्यांना वाटले कि या सोबत काहीतरी क्रिएटिव करावे. म्हणून त्यांनी या पहाडाच्या शेप चेन्ज केला.

विश्वास न्यूज ने मिशेल यांना इंस्टाग्राम द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि या खऱ्या पहाडाचे नाव, Segla mountain आहे जे नॉर्वे मध्ये आहे. त्यांनी सांगितले कि त्यांनी फोटोशॉप च्या मदतीने खऱ्या पहाडाचे शेप बदलून त्याला कोल्ह्याचा आकार दिले. त्यांनी आमच्या सोबत Segla mountain चे छायाचित्र पण शेअर केले, ज्यात थोडे बदलावं करून त्यांनी छायाचित्र बनवले.

Segla mountain चे छायाचित्र गूगल इमेजस वर देखील बघितले जाऊ शकते.

फेसबुक वर हि पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चे देखील आम्ही सोशल स्कँनिंग केले. Ronnie Bottomley हे यूजर युनाइटेड किंग्डम चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: एडिटिंग सॉफ्टवेयर च्या मदतीने बनवले गेलेले छायाचित्र यात दिसत असलेल्या पहाडाच्या आकार कोल्ह्यासारखा नाही. व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.

  • Claim Review : कोल्ह्यासारखे दिसणारे पहाड नॉर्वे मध्ये
  • Claimed By : Ronnie Bottomley
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later