X

Fact Check: व्हायरल पोस्ट मध्ये शरद पवार च्या मॉर्फ चित्रात भाजप चे नेते दाखवण्यात आले

विश्वास न्यूजने तपास केला असता शरद पवार आणि भाजप नेत्यांचे एकत्र असलेले चित्र खोटे असल्याचे लक्षात आले. हे दोन भिन्न चित्रे एकत्र करून तयार केले आहे.

  • By Vishvas News
  • Updated: December 7, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत सोशल मीडिया यूजर्सनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या चित्राचा तपास केला, त्यात चित्र मॉर्फ असल्याचे समजले. शरद पवार यांचे चित्र वेगळ्याने जोडून हे चित्र तयार करण्यात आले आहे. विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट बनावट असल्याचे समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वापरकर्ता यशवंत वर्ते यांनी 27 नोव्हेंबर रोजी एक छायाचित्र पोस्ट केले आणि मराठीत लिहिले: ‘ताई महणत की,’ भाजपचा जोरदार निषेध. आणि पप्पा चुपचाप जाऊन भाजपसोबत हातमिळवणी करतात. ताई, किती दिशाभूल करता जनतेची!’

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल इमेजची सत्यता जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम गुगल रिव्हर्स इमेज टूलचा वापर केला. शोध दरम्यान, आम्हाला 26 नोव्हेंबर 2021 रोजी इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेली एक बातमी सापडली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे त्यात सांगण्यात आले. बातम्यांमध्ये वापरलेल्या प्रतिमेत शरद पवार कुठेच दिसत नव्हते. तर व्हायरल झालेल्या छायाचित्रात माजी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी शरद पवार दिसत आहेत. येथे पूर्ण बातमी वाचा.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीत वापरलेल्या बातमीत देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलचा हवाला देण्यात आला होता. म्हणून आम्ही त्यांचे हँडल देखील स्कॅन केले. 26 नोव्हेंबर 2021 रोजी आम्हाला मूळ चित्र सापडले. ते इथे पहा.

विश्वास न्यूजने आता शरद पवारांचा फोटो कुठून वापरण्यात आला, हे तपासण्यास सुरु केले. आम्हाला शरद पवार यांच्या ट्विटर हँडलवर मूळ चित्र सापडले. 12 नोव्हेंबर 2021 रोजीच्या ट्विटमध्ये, शरद पवार इस्रायलचे कौन्सुल जनरल श्री कोबी शोशानी यांच्यासोबत त्या ट्विट मध्ये पाहिले जाऊ शकतात.

शोध दरम्यान, आम्हाला NCP च्या अधिकृत ट्विटर हँडलवर 26 नोव्हेंबर रोजी एक ट्विट सापडला. यामध्ये व्हायरल झालेला फोटो बनावट असल्याचे सांगण्यात आले.

विश्वास न्यूजच्या तपासात शरद पवार ह्यांच्या चित्राचा गैरवापर करून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दाखवण्यात आल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे ह्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत आम्ही व्हायरल फोटो शेअर केला. त्यांनी सांगितले की हे बनावट आहे. याबाबत पक्षाच्या हँडलवरही सत्यता सांगण्यात आली आहे.

तपासाच्या अंतिम टप्प्यात विश्वास न्यूजने फेक इमेज शेअर करणाऱ्या युजरची चौकशी केली. यशवंत वर्ते हा फेसबुक यूजर महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी असल्याचे आम्हाला कळले.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपास केला असता शरद पवार आणि भाजप नेत्यांचे एकत्र असलेले चित्र खोटे असल्याचे लक्षात आले. हे दोन भिन्न चित्रे एकत्र करून तयार केले आहे.

  • Claim Review : ‘ताई कहती हैं, ”भाजपा का पुरजोर विरोध करो.” और पापा चुपचाप जाकर बीजेपी से हाथ मिलाते हैं. ताई, लोग कितने गुमराह हैं!’
  • Claimed By : फेसबुक यूजर यशवंत वर्ते
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later