X

Fact Check: अहमदाबाद मध्ये नाही, नागपूरात पडला निर्माण होत असलेला पूल, व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी

विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि पूल पडायचा दावा करणारी पोस्ट तपासात दिशाभूल करणारी असल्याचे समजले. अशी घटना अहमदाबाद मध्ये झाली नाही. हि नागपूर ची घटना आहे.

  • By Vishvas News
  • Updated: October 27, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट काही छायाचित्रांसोबत व्हायरल होत आहे. ह्यात एक निर्माण होत असलेल्या पुलाचा भाग पडल्याचा दिसतं. यूजर्स दावा करत आहेत कि हि घटना गुजरात मध्ये घडली. असे सांगितल्या जात आहे कि राज्याची राजधानी अहमदाबाद मध्ये अजित मिल पाशी हि घटना झाली. विश्वास न्यूज ने सत्य जाणून घेण्यासाठी ह्या पोस्ट चा तपास केला. तपासात कळले कि हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे. महाराष्ट्रातील नागपूरात काही दिवसांआधी पुलाचा निर्माण होत असलेला एक भाग पडला हे त्याचे चित्र आहे. हे छायाचित्र काही लोकं अहमदाबाद चे सांगून व्हायरल केले जात आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी सिद्ध झाली.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर हँडल रविन्‍द्र राव ने 22 ऑक्टोबर रोजी एक चित्र अपलोड केले आणि गुजराती मध्ये लिहले कि अहमदाबाद मध्ये निर्माणाधीन पूल पडला.

काँग्रेसच्या हितेंद्र ने 22 ऑक्टोबर रोजी चार चित्र शेअर केले आणि दावा केला कि अजित मिल च्या चार रस्त्यांपाशी पुलाचा भाग तुटला.

https://twitter.com/ravindrabarot/status/1451598948045504519?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1451598948045504519%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.vishvasnews.com%2Fpolitics%2Ffact-check-part-of-the-bridge-under-construction-collapsed-in-nagpur-not-in-ahmedabad-viral-post-is-misleading%2F

व्हायरल पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला आहे. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात, व्हायरल पोस्ट चे स्कॅनिंग करून केली. ह्या पॉट वर बऱ्याच लोकांनी कमेंट केले कि अशी कुठलीच घटना अहमदाबाद मध्ये झाली नाही. हि घटना महाराष्ट्राच्या नागपूर मधील आहे. ह्या कळू च्या आधारे आम्ही गूगल सर्च केले. आम्हाला काही मीडिया रिपोर्ट्स आणि युट्युब व्हिडिओस देखील मिळाले.

Nagpur Road Experience नावाच्या युट्युब चॅनेल वर 20 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ ब्लॉग अपलोड करून ह्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. हि घटना नागपूर च्या पार्डी पुलाची आहे. ह्या व्हिडिओ मध्ये आम्हाला जागेची लोकेशन आणि ब्रिज चा स्टाईल दिसला, जसा आम्हाला पोस्ट मध्ये दिसला. पूर्ण व्हिडिओ खाली बघा.

एबीपी न्‍यूज आणि नवभारत टाइम्‍स च्या वेबसाईट वर देखील आम्हाला हि बातमी दिसली. ह्या प्रमाणे, महाराष्ट्रातील, नागपूरच्या कळमना मध्ये दोन सेगमेंट मधील भाग खाली पडला. हि घटना रात्री नऊच्या सुमारास झाली. हि बातमी 19 ऑक्टोबर ला प्रकाशित झाली होती.

नवभारत टाइम्‍स च्या ट्विटर हॅन्डल वर देखील आम्हाला हा व्हिडिओ दिसला. खाली लिहले होते, महाराष्ट्रातील, नागपूरच्या कळमना पुलाचा भाग कोसळला.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या संबंधी, दैनिक जागरण चे अहमदाबाद चे वरिष्‍ठ संवाददाता शत्रुघ्न शर्मा ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि मागील काही दिवसांपासून काही चित्र अहमदाबाद च्या नावाने व्हायरल होत आहे, जे खरे नाही. अहमदाबाद मध्ये अशी कुठलीच घटना झाली नाही. चित्र आणि व्हिडिओ अहमदाबाद चे नाही.

शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने ट्विटर हैंडल रविन्‍द्र राव ह्यांची स्कॅनिंग केली. आम्हाला कळले कि हॅन्डल 2013 साली बनवले गेले. ह्यांना 640 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि पूल पडायचा दावा करणारी पोस्ट तपासात दिशाभूल करणारी असल्याचे समजले. अशी घटना अहमदाबाद मध्ये झाली नाही. हि नागपूर ची घटना आहे.

  • Claim Review : अहमदाबाद मध्ये पूल पडला
  • Claimed By : ट्विटर हैंडल रविन्‍द्र राव
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later