X

Fact Check : ‘कौन बनेगा करोड़पति’ च्या नावावर व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे, सतर्क रहा

विश्वास न्यूज च्या तपासात केबीसी च्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले.

  • By Vishvas News
  • Updated: November 30, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. ह्यात पीएम नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन आणि मुकेश अंबानी ह्यांचे छायाचित्र वापरले गेले आहे. ह्या पोस्ट सोबत सांगण्यात येत आहे कि लोकं लकी ड्रॉ मध्ये पंचवीस लाख रुपये जिंकू शकतात. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. विश्वास न्यूज आपल्या वाचकांना अनुरोध करत आहे कि त्यांनी ह्या आणि पोस्ट पासून सावध राहावे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर जगजीत सिंगने 21 नोव्हेंबरला रोजी पोस्टर पोस्ट केले होते. त्यावर लिहले होते: ‘सभी भारतीय स‍िम कार्ड व्हाट्सऐप आईएमओ लक्‍की ड्रा। इटा इंडिया टेलीकम्‍यूनिकेशन। अनुबंध प्रिय ग्राहक तुम्‍हारा जीवन अच्‍छा है कि आप 25,00,000 का भुगतान कर सकते हैं, केबीसी जियो विभाग दवारा कंपनी की राशि और विनियमों का पूरी तरह से उपयोग करके अपने मूल्‍य को कम करें। भाग्‍यशाली ड्रा धारक का नाम अमिताभ बच्‍चा, मुकेश अंबानी, नरेंद्र मोदी।’

या पोस्टरवर मोबाईल क्रमांक आणि लॉटरी क्रमांकही देण्यात आला आहे. अनेक यूजर्स ह्या मेसेज ला खरे समजून सोशल मीडिया वर शेअर करत आहेत.

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल पोस्टची चौकशी करण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम गुगल सर्च टूलचा वापर केला. संबंधित कीवर्ड टाइप करून सर्च केल्यावर आम्हाला असे अनेक रिपोर्ट्स समोर आले, ज्यात केबीसीच्या नावाने फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. 9 ऑक्टोबर 2020 रोजी Jagran.com वर प्रकाशित एका बातमीत, व्हायरल पोस्टरचा वापर करून असे म्हटले आहे की, ‘कौन बनेगा करोडपती (KBC) टीव्ही शोचा दहावा सीझन सुरू होताच ठग सक्रिय झाले आहेत. टोळीचे सदस्य फोन करून २५ लाखांचे बक्षीस मिळाल्याचे नाटक करत आहेत. त्यासाठी व्हॉट्सअॅपवर लॉटरी क्रमांकाची पावती पाठवली जात आहे. सोबतच त्यांना नंबर देऊन व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सांगितले जात आहे.’ संपूर्ण बातमी येथे सविस्तर वाचता येईल.

विश्‍वास न्यूजने तपासाच्या पुढील टप्प्यात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे सहयोगी उपाध्यक्ष फ्रँको विल्यम ह्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केला. हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. यात तथ्य नाही असे देखील ते म्हणाले.

अशा संदेशांचा हेतू जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सायबर सुरक्षा तज्ञ आयुष भारद्वाज ह्यांना संपर्क केला. या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारची पोस्ट व्हायरल करून लोकांना लॉटरी लागण्याची खोटी गोष्ट त्यांना सांगून त्यांची फसवणूक केली जाते, त्यानंतर आयकर कायद्याचा हवाला देऊन लॉटरी रक्कम खात्यात हस्तांतरित करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या वस्तूंमध्ये काही पैशांची मागणी देखील केली जाते.

भारद्वाज यांनी स्पष्ट केले की, उदाहरणार्थ, एक लाखाची लॉटरी लागली, तर हे लोक म्हणतात की हजार रुपये प्रोसेसिंग फी, हजार रुपये आयकर इत्यादी. असे करून हे लोक वापरकर्त्याला आपल्या जाळ्यात अडकवतात आणि रक्कम कमी करून बाहेर काढतात. अनेकांकडून तुटपुंजी रक्कम घेतल्याने हे लोक पोलिसांच्या नजरेतून सुटतात. कोणतीही मोबाईल कंपनी लॉटरीसारखी गोष्ट देत नाही, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी

तपासाअंती विश्वास न्यूजने केबीसीच्या नावाने फेक मेसेज पोस्ट करणाऱ्या युजरचा तपास केला. फेसबुक वापरकर्ता जगजीत सिंगच्या सोशल स्कॅनिंगमध्ये असे दिसून आले की यूजर सगळ्यात जास्ती व्हायरल कन्टेन्ट पोस्ट करत आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात केबीसी च्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले.

  • Claim Review : केबीसी चा लकी ड्रॉ
  • Claimed By : फेसबुक यूजर जगजीत स‍िंह
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later