X

Fact Check: स्मृति इराणिच्या विरोधात एक वर्षाआधी झालेल्या प्रदर्शनचा व्हिडिओ आता होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात स्मृती इररणी बद्दल केलेल्या विरोध प्रदर्शनाचा व्हिडिओ एक वर्ष जुना असल्याचा समजले. काही लोकं ह्याला आताच समजून व्हायरल करत आहेत. हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे.

  • By Vishvas News
  • Updated: October 23, 2021

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर केंद्रीय मंत्री आणि अमेठी च्या आमदार स्मृती इराणी यांच्या विरुद्ध झालेल्या एका प्रदर्शनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये बरेच लोक एका कॉन्व्हॉय समोर प्रदर्शन करताना दिसतात. ह्या व्हिडिओ ला यूजर आता दावा करत शेअर करत आहेत कि वाराणसी मध्ये इराणी ह्यांच्या विरोधात झालेले हे प्रदर्शन आहे ह्याला मीडिया मध्ये कुठेच दाखवले जात नाही आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केल्यावर कळले कि हा व्हिडिओ 2020 मध्ये वाराणसी मध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनाचा आहे, ज्याला लोकं आताचा सांगून शेअर करत आहेत. सध्या असे काहीच घडले नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज समस्‍तीपुर कुमार विजय ने 14 ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि दावा केला: ‘वाराणसी में स्मृति ईरानी का भयंकर विरोध हुआ लेकिन गोदी मीडिया ने किसी भी चैनल पे नहीं दिखाया।
फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास देण्यात आला आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास करण्यासाठी गूगल ओपन सर्च ची मदत घेतली. संबंधित किवर्ड च्या माध्यमाने आम्हाला बरेच मीडिया रिपोर्ट मिळाले आणि व्हिडिओ देखील मिळाले. ह्यातून कळले कि 2020 मध्ये वाराणसी मध्ये स्मृती इराणी ह्यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी प्रदर्शन केले होते हा त्याचा व्हिडिओ आहे, जो आताचा सांगून व्हायरल होत आहे.

लाइव वीएनएस नावाच्या यूट्यूब चॅनेल ने 3 ऑक्टोबर, 2020 हा व्हिडिओ अपलोड केला होता. ह्यात सांगितले होते कि वाराणसी मध्ये कमिश्‍नरी च्या बाहेर लोकांनी इराणी ह्यांच्या विरोधात प्रदर्शन केले आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. हा व्हिडिओ इथे बघा.

सर्च च्या वेळी आम्हाला दैनिक जागरण च्या वेबसाईट वर देखील हि जुनी रिपोर्ट मिळाली. 3 ऑक्टोबर 2020 रोजी पब्लिश झालेल्या ह्या बातमीत सांगितले गेले कि केंद्रीय मंत्री स्मृति इराणी ह्यांच्या वाराणसी दौऱ्याच्या वेळी कमिश्‍नरी कार्यालयच्या जवळ येताना समाजवादी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी घेराव केल्यानंतर वापसी मध्ये काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला घेरले आणि गाई पुढे बसले. ह्या संबंधी पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या विरोधात धारा 151 चे कलम लावले. पूर्ण बातमी इथे वाचा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने त्या वेळी प्रदर्शनात सामील असलेले काँग्रेस नेते हरीश मिश्रा ह्यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले कि हाथरस घटनेनंतर स्मृती इराणी वाराणसी मध्ये आल्या असताना, त्यावेळी हे प्रदर्शन करण्यात आले. सध्या अशी कुठलीच घटना घडलेली नाही. पोलिसांनी तेव्हा चौदा लोकांना अटक देखील केली.

विश्वास न्यूज ने दिशाभूल करणाऱ्या पोस्ट ला अपलोड करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि फेसबुक पेज समस्‍तीपुर कुमार अजय ला 2974 लोकं फॉलो करतात. हा पेज 16 सप्टेंबर 2018 रोजी बनवण्यात आला. आम्हाला ह्या पेज वर बिहार बद्दल चा कन्टेन्ट दिसला.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात स्मृती इररणी बद्दल केलेल्या विरोध प्रदर्शनाचा व्हिडिओ एक वर्ष जुना असल्याचा समजले. काही लोकं ह्याला आताच समजून व्हायरल करत आहेत. हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे.

  • Claim Review : वाराणसी में स्मृति ईरानी का भयंकर विरोध हुआ लेकिन गोदी मीडिया ने किसी भी चैनल पे नहीं दिखाया।
  • Claimed By : फेसबुक पेज समस्‍तीपुर कुमार अजय
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later