X

Fact Check: मुसलमान आणि दलितांवर संघ प्रमुख मोहन भागवत यांनी नाही केले हे वक्तव्य

  • By Vishvas News
  • Updated: August 11, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्युज): सोशल मीडिया वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावानी एक खोटे वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जात आहे कि, संघ प्रमुखांनी मुसलमान आणि दलितांच्या विरोधात वक्तव्य केले आहे. सांगितलेल्या दाव्यात असे म्हंटले जात आहे कि सरसंघचालक यांनी मुसलमानांना संपवण्याबद्दल आणि दलितांचे आरक्षण संपवण्यावर वक्तव्य केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. आणि पोस्ट मध्ये वापरले गेलेले छायाचित्र देखील एडिटेड असल्याचे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, “मीना कुमारी सोनी” यांनी Congressi या नावाने असलेल्या फेसबुक ग्रुप वर एक छायाचित्र अपलोड केले ज्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाने एक वक्तव्य व्हायरल होत आहे. या वक्तयात असे लिहले गेले आहे, “पहले इस देश से मुसलमानों को खत्म करना है फिर दलितों (एससी एसटी ओबीसी) का आरक्षण खत्म करना है सिर पर बैठे हुए हैं ये संविधान की वजह से। – RSS chief (मोहन भागवत)”

अर्थात: पहिले या देशातून मुसलमानांना संपवायचे आहे आणि नंतर दलितांचे (एससी एसटी ओबीसी) यांचे आरक्षण संपवायचे आहे. हे लोक संविधानामुळे डोक्यावर बसले आहेत. -RSS chief (मोहन भागवत)
क्या हो रहा है वायरल?

या पोस्ट ला फेसबुक वर शेअर केले गेले त्याचे अर्काइव्ह लिंक इथे बघा.

तपास:
अश्या प्रकारचे वक्तव्य जर कोणी केले ता त्याची मोठी बातमी नक्की बनते. त्यासाठी आम्ही आमचा तपास सध्या गूगल न्यूज सर्च ने सुरु केला. आम्हला आमच्या तपासात अशी कुठलीही बातमी आढळली नाही, ज्यात मोहन भागवत यांनी मुसलमान किंवा दलितांवर असे वक्तव्य केले असतील. पण आम्हाला एक व्हिडिओ सापडला, ज्यात ते म्हणतात कि मुसलमानांचा विरोध करणारा एक हिंदू नसू शकतो. News 18 India च्या अधिकृत YouTube चॅनेल वर आम्हला एक व्हिडिओ १९ सप्टेंबर २०१८ रोजी अपलोड केल्याचे दिसले. या बुलेटिन सोबत हेडलाईन मध्ये लिहले होते: “मुसलमान का विरोध करने वाला हिंदू नहीं: मोहन भागवत”

आम्हाला आमच्या तपासात १९ सप्टेंबर २०१८रोजी प्रकाशित दैनिक जागरण ची एक बातमी देखील सापडली, ज्यात मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर अजून सांगितले. बातमी ची हेडलाईन होती: मोहन भागवत बोले, मुस्लिम संघ से डरें नहीं, आकर समझें और परखें.

तपासात पुढच्या टप्प्यात आम्हाला जाणून घ्यायचे होते कि खरंच मोहन भागवत यांनी असे कुठले वक्तव्य केले आहे का. आमच्या तपासात आम्हाला RSS च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर एक ट्विट मिळाले, ज्यात त्यांनी म्हंटले होते कि संघ मागासलेल्या वर्गासाठी आरक्षणाचे पूर्णपणे समर्थन करतो. हा ट्विट १९ ऑगस्ट २०१९ रोजी केला गेला होता. हा ट्विट इथे बघा:

दैनिक जागरण मध्ये १९ ऑगस्ट २०१९ रोजी प्रकाशित एका बातमी प्रमाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटले कि ते आरक्षणाच्या समर्थन करतात आणि जे लोक याचा विरोध करतात त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे. भागवत यांनी म्हंटले कि त्यांनी पहिले देखील आरक्षणावर वक्तव्य केले आहे. पण त्या वेळी त्या वक्तव्यावरून खूप वाद झाला आणि खऱ्या मुद्द्यापासून हि चर्चा भरकटली भरकटली.

तपासात आम्ही या पोस्ट वरून आम्ही संघाचे सहप्रचार प्रमुख नरेंदर कुमार यांच्या सोबत संपर्क साधला. विश्वास टीम सोबत चर्चा करताना ते बोलले, “व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. संघ प्रमुख यांनी असे कुठलेही वक्तव्य केले नाही. संघ ने कधीही मुसलमानांना भारतातून काढले पाहिजे असे म्हंटले नाही.”
या पोस्ट ला मीना कुमारी सोनी यांनी फेसबुक यूजर द्वारा शेअर केले गेले. या यूजर ला २,०३३ लोक फोल्लो करतात. हे अकाउंट २०१४ मध्ये बनवले गेले होते.

निष्कर्ष: विश्वास टीम च्या तपासात व्हायरल झालेली पोस्ट खोटी असल्याचे आढळले. मोहन भागवत यांनी मुसलमानां मारण्याबद्दल किंवा दलितांचे आरक्षण संपवण्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही.

  • Claim Review : सोशल मीडिया पर एक पोस्ट वायरल हो रही है, जिसमें RSS सुप्रीमो मोहन भागवत के नाम से एक बयान लिखा गया है। इस बयान में देश के मुस्लिम समुदाय को मारने और दलित समुदाय के आरक्षण को खत्म करने की बात कही गई है।
  • Claimed By : FB User- मीना कुमारी सोनी
  • Fact Check : False
False
    Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

संबंधित लेख

Post saved! You can read it later