Fact Check: पूरग्रस्तांना मदत करतानाचा व्हिडिओ पंजाबचा नाही
'विश्वास न्यूज'ने केलेल्या त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. खरे तर हा व्हिडिओ जुना आणि बांग्लादेशचा आहे. 2024 साली आलेल्या पुराच्या दरम्यान, बांगलादेशातील मदरशाचे विद्यार्थी पुढे आले होते आणि त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली होती.
- By: Pragya Shukla
- Published: Sep 12, 2025 at 05:39 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). पंजाबमधील पुराशी संबंध जोडत, काही लोक पाणी साचलेल्या भागात अन्न वाटप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक पाण्यात पोहत अन्न वाटप करताना दिसत आहेत. त्यास शेअर करताना असा दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ पंजाबमधील आहे.
‘विश्वास न्यूज’ने केलेल्या त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. खरे तर हा व्हिडिओ जुना आणि बांग्लादेशचा आहे. 2024 साली आलेल्या पुराच्या दरम्यान, बांगलादेशातील मदरशाचे विद्यार्थी पुढे आले होते आणि त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली होती.
काय होत आहे व्हायरल?
‘kaseem_king_khan’ या इंस्टाग्राम युजरने, 7 सप्टेंबर 2025 रोजी हा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पंजाबमध्ये पूराने थैमान घातले आहे, आमचे सहकारी बंधू अस्वस्थ आहेत, प्रत्येकजण मदतीसाठी कठोर परिश्रम करत आहे.”
पोस्टची संग्रहित लिंक येथे पाहा.

तपास
या व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डने गुगलवर सर्च केले. आम्हाला 25 ऑगस्ट 2024 रोजी, ‘BanglaVision News’ च्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ सापडला. बंगाली भाषेत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बांगलादेशात आलेल्या पुराचा आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगलवर शोध घेतला. आम्हाला व्हायरल व्हिडिओ बांगलादेशातील अनेक युट्यूब चॅनेलवर आढळला. 25 ऑगस्ट 2024 रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. येथे देखील हा व्हिडिओ बांगलादेशातील पुराचा असल्याचे म्हटले आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मदरशाचे विद्यार्थी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी पाण्याखाली गेलेल्या भागात जाऊन लोकांना मदत केली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर यापूर्वीही वेगवेगळ्या दाव्यांसह व्हायरल झाला आहे. त्यावेळी विश्वास न्यूजने या दाव्याची चौकशी केली होती आणि सत्य उघड केले होते. संपूर्ण रिपोर्ट, या लिंकवर क्लिक करून वाचता येईल.
त्यावेळी आम्ही बांगलादेशी प्रोबॅश टाईम्सचे संपादक, अराफत रहमान यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आम्हाला सांगितले होते की, हा व्हिडिओ इथला आहे. लोकांनी याच प्रकारे पूरग्रस्तांना मदत करत केली आहे.
9 सप्टेंबर 2025 रोजी दैनिक जागरणच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार,पंजाबमधील पुरामुळे लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री हरदीपसिंग मुंडियान यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 जिल्ह्यांमध्ये 3.87 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत 1,84,938.05 पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत 23,015 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पंजाबमध्ये 123 सक्रीय मदत शिबिर असून, त्यात 5,416 लोकांनी आश्रय घेतला आहे.
अखेरीस, आम्ही चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरचे खाते स्कॅन केले. आम्हाला आढळले की, या युजरला दोन हजारांहून अधिक लोक फॉलो करत आहेत.
निष्कर्षः विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळले की, पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या लोकांच्या व्हायरल व्हिडिओबद्दलचा दावा खोटा आहे. खरे तर हा व्हिडिओ जुना आणि बांग्लादेशचा आहे. 2024 साली आलेल्या पुराच्या दरम्यान, बांगलादेशातील मदरशाचे विद्यार्थी पुढे आले होते आणि त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली होती.
- Claim Review : पंजाबमध्ये आलेल्या पुराचा व्हिडिओ.
- Claimed By : FB User kaseem_king_khan
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











