Fact Check: लॉरेन्स बिस्नोईला नाही मिळाला जामीन, 2020चा व्हिडीओ होतोय व्हायरल
विश्वास न्यूजने या व्हायरल दाव्याची चौकशी केली असता समजले की सोशल मीडियावर केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडीओ सध्याचा नसून, तो 2020 सालचा जुना व्हिडीओ आहे. आणि आता तो पुन्हा शेअर करून चुकीच्या संदर्भात मांडला जात आहे. हा व्हिडीओ त्या काळातील आहे, जेंव्हा लॉरेन्स बिश्नोई यांना पंजाब फजिल्का कोर्टात हजर करण्यात आले होते आणि त्यांना जामीन मिळाला होता.
- By: Umam Noor
- Published: Dec 8, 2025 at 12:45 PM
नवी दिल्ली(विश्वास न्यूज)। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे त्यामध्ये गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करत असलेल्या युजर्सनी असा दावा केला आहे की बिश्नोईला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे.आणि ही फुटेज त्याच वेळेची आहे.हा व्हिडीओ या दाव्याबरोबर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती शेअर केला जात आहे.
विश्वास न्यूजने या व्हायरल दाव्याचा तपास केला आणि त्या तपासात असे लक्षात आले की हा दावा सपशेल खोटा आहे. तपासात असं लक्षात आले की हा व्हिडीओ वर्तमानातील म्हणजेच आत्ताचा नाही. तर 2020 मधील जुना व्हिडीओ आहे. आणि आता तोच जुना व्हिडिओ पुन्हा नव्याने शेअर केला जात आहे.जेंव्हा त्याला पंजाब पोलिसांनी फजिल्कामधील कोर्टात हजर केले होते आणि त्याला जामीन मिळाला होता तेंव्हाचा हा व्हिडीओ होता.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
फेसबुक युजर झूमा झा यानी 27 नोव्हेंबरला व्हायरल पोस्ट शेअर केली होती आणि लिहले होते की,“लॉरेन्स बिश्नोईचे लॉक उघडले, त्याला मिळाली बेल.”
पोस्ट इथे पहा.

तपास
आम्ही तपास सुरू केला तेंव्हा आम्ही तो व्हायरल व्हिडीओ लक्षपूर्वक पाहिला तेंव्हा आम्हाला व्हिडीओमध्ये फजिल्का लिहलेले दिसले. याच आधारावर आम्ही तपास सुरू केला, व्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेंप्सला आम्ही गुगल लेंसमध्ये सर्च केले.की-वर्डच्या मदतीने सर्च केले असता आम्हाला हा व्हिडीओ अरबी लाईव्ह मीडिया नावाच्या यू ट्यूब चॅनलवर 24 फेब्रुवारी 2020 मध्ये अपडेट झालेला दिसला. या यू ट्यूबच्या चॅनलच्या माहितीनुसार, फजिल्का(पंजाब)मधील कोर्टात लॉरेन्स बिश्नोईची सुनावणी झाली होती आणि त्याला जामीन मिळाला होता.
या प्रकरणात न्यूज सर्च केली असता आम्हाला हा व्हिडीओ यू ट्यूब चॅनलवर 2 मार्च 2020 मध्ये अपलोड केलेला दिसून आला. असे सांगण्यात आले की फजिल्का कोर्टातुन बिश्नोईबरोबर चार लोकांना सोडण्यात आले होते.
तपास पुढे नेत आम्ही हे देखील पाहिलं की लॉरेन्स बिश्नोईच्या जामीना विषयी सध्या कोणती ही बातमी पुढे आलेली नाही. तपासा दरम्यान आम्हाला अशी कोणतीही ताजी बातमीसमोर आल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
लॉरेन्स बिश्नोई पंजाबमधील फजिल्का जिल्ह्यातील दूतारावाली गावात राहणारा एक कुख्यात गॅंगस्टर आहे.ज्याचे खरे नाव बलकरण बरार आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांड, सलमान खानला धमकी देणे यासारख्या प्रकरणामध्ये त्याचे नाव समोर आले आहे. विविध राज्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे त्याला वेळोवेळी जेलमध्ये ठेवण्यात आले असून सध्या गुजरातमधील साबरमती सेंट्रल जेलमध्ये तो कैद आहे.
व्हायरल व्हिडीओच्या पडताळणीसाठी आम्ही आमचे सहयोगी पंजाब जागरण फजिल्कामधील सिनिअर रिपोर्टर तजिंदर सिह यांचीशी संपर्क केला त्यांनी आम्हाला सांगितलं की हा व्हिडीओ खूप वर्षे जुना आहे, लॉरेन्स बिश्नोईला जामीन मिळालेला नाही.
आधीही लॉरेन्स बिश्नोईबद्दल खूप दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचे फॅक्ट चेक रिपोर्ट वाचता येऊ शकतात.
आता वेळ होती खोटी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक युजर झूमा झूच्या स्कॅनिंगची, स्कॅनिंगमधून कळले की झूमा झूला 12 हजार लोकं फॉलो करतात. याच युजरच्या बायोनुसार, ती झाशीची राहणारी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने या व्हायरल दाव्याची चौकशी केली असता समजले की सोशल मीडियावर केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडीओ सध्याचा नसून, तो 2020 सालचा जुना व्हिडीओ आहे. आणि आता तो पुन्हा शेअर करून चुकीच्या संदर्भात मांडला जात आहे. हा व्हिडीओ त्या काळातील आहे, जेंव्हा लॉरेन्स बिश्नोई यांना पंजाब फजिल्का कोर्टात हजर करण्यात आले होते आणि त्यांना जामीन मिळाला होता.
- Claim Review : बिश्नोईला कोर्टामध्ये जामीन मिळाला आहे आणि हा व्हिडीओ त्याच वेळचा आहे.
- Claimed By : फेसबुक युजर झूमा झू
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.











