X

Fact Check : संबित पात्रा याच्या मुलीबद्दल केलेला व्हायरल दावा खोटा

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि भाजप नेता संबित पात्रा यांच्या मुलीच्या नावावर व्हायरल होत असलेलू न्यूज प्लेट खोटी आहे. काही लोकं या दाव्या ला जाणून-बुजून व्हायरल करत आहे.

  • By Vishvas News
  • Updated: November 28, 2020

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): देशात लव्ह जिहाद च्या विषयावर सगळीकडे वादा-वादी सुरु असताना एक खोटा आणि आपत्तीजनक दावा सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. अशीच एक बातमी भाजप चे प्रवक्ता संबित पात्रा यांच्या मुलीबद्दल व्हायरल होत आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आम्हाला कळले कि हि पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. याला ऑनलाइन टूल्स च्या मदतीने बनवले गेले आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राज प्रीत ने पब्लिक ग्रुप रवीश कुमार वर एक खोटी पोस्ट अपलोड केली आणि दावा केला कि संबित पात्रा च्या मुलीने रचवले जिहाद.
या पोस्ट ला खरे मानून दुसरे यूजर देखील शेअर करत आहे.

फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी भाजप चे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्या मुली बद्दल व्हायरल होत असलेल्या पोस्ट ला स्कॅन केले. कोणत्या पण न्यूज चॅनेल वर अशी भाषा आणि व्हायरल पोस्ट मध्ये वापरलेल्या लोगो च्या जागे वर लोगो चा उपयोग केला जात नाही. याच्या सोबतच व्हायरल इमेज च्या डाव्या बाजूला बरेच स्टार वापरून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

विश्वास न्यूज आपल्या वाचकांना सांगू इच्छिते, कि ‘ब्रेक युअर ऑन न्यूज’ सारख्या वेबसाईट च्या मदतीने या प्रकारच्या न्यूज प्लेट बनवून खोट्या बातम्या आतापर्यंत पसरवल्या गेले आहे.

तपासाच्या वेळी आम्ही ABP न्‍यूज च्या एडिटोरिअल डिपार्टमेंट च्या एका सिनियर एडिटर ला संपर्क केला. त्यांनी सांगितले कि खोटी बातमी पसरवणारे लोकं आपल्या हिशोबानी प्लेट बनवून घेतात. या बातमीचा आमच्या चॅनेल सोबत काहीच संबंध नाही.

शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर च्या अकाउंट चा तपास केला. राज प्रीत चा फेसबुक अकाउंट लॉक होता. यातुन आम्हाला केवळ इतके कळले कि या अकाउंट ला १३८७ लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि भाजप नेता संबित पात्रा यांच्या मुलीच्या नावावर व्हायरल होत असलेलू न्यूज प्लेट खोटी आहे. काही लोकं या दाव्या ला जाणून-बुजून व्हायरल करत आहे.

  • Claim Review : संबित पात्रा च्या मुलीने रचवले जिहाद
  • Claimed By : राज प्रीत
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion
पुढे वाचा

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later